https://lokwanee.blogspot.com/
लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
22 जून : आज सायंकाळी 5 वाजेच्या आसपास शेनगाव येथे अत्यंत दुःखद घटना घडली.
शेतकरी शंकर वैद्य यांच्या वरती नैसर्गिक विज पडून त्यांचा मृत्यू झाला. शंकर वैद्य हे शेतात शेतीचे काम करत होते. सायंकाळी हवा धुंद सुटली व विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी पाऊस येण्याची शक्यता पाहून ते व लगेच घराकडे निघाले होते. पण त्यांना परतीच्या वेळेस रस्त्यात विजेने त्यांच्यावर घाला घातला. यात ते ठार झाले. काही क्षणात शेणगावातील लोकांना हि घटना कडताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत त्यांचे प्राण गेले होते. गावातील लोकांनी त्याना बैलगाडी वरती गावात आणले.