चिमुरात लपून छपून येणाऱ्या दारूवर पोलिसांची धाड

Mahawani




चिमुरात लपून छपून येणाऱ्या दारूवर पोलिसांची धाड

https://lokwanee.blogspot.com/
लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

खूप दिवसापासून चिमूर परिसरात अवैद्य दारूविक्रेते वेगवेगळी शक्कल लावून स्वतःच्या वाहनाने देशी विदेशी दारू आणून विक्री करीत आहे यावर पोलिसांनी आपली चाणाक्ष बुद्धीचा वापर करून अवैद्य दारू विक्रेता धनंजय बिंगेवार रा. गुरुदेव वार्ड चिमूर याच्यावर पाळत ठेऊन आज रोजी त्याने आपली ग्रे रंगाची सुझुकी मोपेड क्र MH 34 BS 8866 मधील फूट रेस्ट मध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल  लपवून पिंपळनेरी मार्गाने येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने चिमूर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यात 26 नग विदेशी दारूच्या निपा असा एकूण 78,900 रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली. 
           सदरची कारवाही मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.  तारे साहेब , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात पोहवा विलास निमगडे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे   यांनी पार पाडली.
To Top