लोकवानी- विरेंद्र पुणेकर
(२४ जून २०२३)
(२४ जून २०२३)
24 जून ते 3 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या कालावधीमध्ये विदर्भातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होणार असं त्यांनी सांगितलं. या कालावधीत एवढा पाऊस पडणार की नदी नाले ओसांडून वाहतील. पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकरी बांधव नवीन जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणी करताना किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने आणि कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिला आहे.