महाजनसंपर्क अभियान निमित्त माथरा येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश

Mahawani




लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

महाजनसंपर्क अभियान निमित्त माथरा येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश

        राजुरा: 23 जून 2023 रोजी सम्राट सभागृह राजुरा येथे भारताचे प्रधानमंत्री  मां. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला  यशस्वीरित्या 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संयुक्त मोर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. ना. भूपेंद्रजी यादव केंद्रीय मंत्री पर्यावरण व वने तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हंसराज अहिर राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागासवर्ग भारत सरकार, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा, मा. संजय धोटे माजी आमदार राजूरा, मा. देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रपूर यांच्या उपस्थितीत माननीय सुदर्शन निमकर व हरिभाऊ झाडे सरपंच ग्रामपंचायत खामोना यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खामोना ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत माथरा येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच शारदा जगदीश तलांडे, ग्रामपंचायत सदस्य अलका दिलीप वैद्य, श्रावण विधाते, मारुती शिरसागर, गोविंदा आत्राम, प्रकाश आत्राम, महादेव विधाते, भीमराव सोयाम, छायाबाई आत्राम, मीराबाई आत्राम, उषा परचाके, कामिना टेकाम, सुमनबाई परचाके, अर्चना आत्राम, कांताबाई टेकाम शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी दिलीप गिरसावळे उपस्थित होते.


To Top