कढोली (बु.) मार्गाच्या कामाला मिळेना मुहूर्त.

Mahawani


वाहन चलकाच्या पायाला मोठी दुखापत

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ जून २३

राजुरा/कढोली (बु.) : गेल्या एक वर्षापासून पोवणी, कढोली, हळस्थी मार्गाचे रुंदीकर व नवीनीकरणाचे काम सुरु असून. सदर कामात काही पूलांचे काम देखील आहे त्यातील काही पूर्ण झाले काही अद्यापही सुरु आहे. परंतु सदर कामे गेल्या एक वर्षापासून सर्वत्र ठप्प असून पावसात रस्त्याची पूर्णता दुर्दशा झाली आहे. रस्त्या काटी असलेले माती रस्त्यावर आल्याने चिखलाचे साम्राज्य झाले आहे. सदर चिखलावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक ठरत असून कढोली गावातून जात असणाऱ्या सीमेंट रोड चे काम अर्धवट झाले असून अर्धवट सीमेंट रोड मधून बाहेर निघालेले लोखंडी सलाख वाहतूक करणाऱ्या नांगरीकांना धोकादायक ठरत आहे. 

    या आधीही सदर लोखंडी सलाख वाहनात अळकून वाहन चलकाच्या पायाला मोठी दुखापत देखील झाली होती याच बरोबर पुन्हा अपघात होणार नाही हे नाकारता येत नाही लोखंडी सलाखिने  वाहतूक करणाऱ्याच्या जीवाला धोका देखील होऊ शकते असे नगरिकातून बोलले जात आहे.

    सदर रस्त्यावर ओतलेला काँक्रीट मधून बाहेर निघालेल्या लोखंडी सलाखी अक्षरक्षा हाताणे बाहेर ओढल्यास हातात येत असून सदर सलाख दीखाव्या करीता रोवण्यात आल्या आहे असे रोज रस्त्याची पाहणी करणारे स्थानिक नागरिक बोलत आहे. रस्त्याच्या आजू - बाजूने नालीचे काम अर्धवट झाल्याने पावसात पाण्याची वाट सदर अर्धवट कामाने कोंबल्याने पाणी रस्त्यावर साचून मोठ-मोठे पाण्याचे खड्डे निर्माण झाले असून वाहतूक करणाऱ्या नागरिकांवर खड्डद्यातिल पानी त्यांच्या शरीर व वाहनावर येत आहे. 

    सदर रस्त्या वरुण एका बाजूने मोठे वाहन आल्यास दुसऱ्या बाजूने येणारे लहान वाहन देखील या मार्गातून पार होऊ शकत नाही. हीच समस्या गेल्या वर्षभरा पासून सातत्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागत आहे. सदर समस्येची माहिती प्रशासन व कंत्रातदार यांना असून हि या कळे हितपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. (mahawani) (kadholi)
To Top