वनहक्क कायद्याविषयी पंचायत प्रतिनिधींना मार्गदर्शन !

Mahawani


लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(२१ जून २०२३)


देवाडा येथे पंचायत प्रतिनिधींचे प्रशिक्षण वनहक्क कायद्याविषयी पंचायत प्रतिनिधींना मार्गदर्शन 

         राजुरा तालुक्यातील देवाडा (सिद्धेश्वर) येथे फाऊंडेशन फॉर इकॉलाजिकल सिक्युरिटी (एफ.ई.एस.)सामाजिक संस्थेच्या वतीने सामूहिक वनहक्क व्यवस्थापन कायद्यावर पंचायत प्रतिनिधींचे प्रशिक्षण पार पडले.यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष देवाडा येथील सरपंच शंकर मडावी,ग्राम पंचायत सदस्य अब्दुल जावेद,शंकर मेश्राम, माजी ग्राम पंचायत सदस्य मधुकर आत्राम, मंजुषा अनमुलवार,ज्येष्ठ नागरिक पोचय्या जल्लावार ,सुभाष तेलीवार, पोस्ट मास्तर वासुदेव कोंदडवार,सुधाकर कटकमवार,श्रीनिवास चेन्नुरवार,प्रकाश काळे उपस्थित होते. यावेळी प्रकाश काळे यांनी उपस्थित पंचायत प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. सरपंच शंकर मडावी यांनी मार्गदर्शनातून गावाच्या सर्वांगीण विकासात गावकऱ्यांची भूमिका महत्वाची असून ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या सहकार्याने वनहक्क व्यवस्थापन करून गावाच्या विकासाचा जागर घडवून आणण्यासाठी गावातील नागरिकांनी प्रयत्नशील असले पाहिजे.आपल्या गावाजवळ मोठ्या प्रमाणात जंगल आहे.वनहक्क कायद्यानुसार जंगलांचा उपयोग गावांच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे. असे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य अब्दुल जावेद, माजी ग्राम पंचायत सदस्य मंजुषा अनमुलवार, यांनी वनहक्क कायदा संदर्भात मार्गदर्शन केले.

 गावाच्या विकासासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असा सूर मार्गदर्शनातून पुढे आला.यावेळी प्रशिक्षणादरम्यान ग्रामस्थांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रकाश काळे यांनी केले.तर आभार शितल कर्णेवार यांनी मानले. परिसरातील पंचायत प्रतिनिधी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top