(२४ जून २०२३)
राजुरा शहरातील चिकन मार्केट लगत असलेली लक्की बार येतील घडलेली घटना लक्की बार मध्ये अभय लांडे (२८) वर्षीय युवक बिअर पिण्या करीता गेला त्याने बिअर मागवली बियर चा एक घोट घेतला व तो बाहेर गेला त्याने ती बिअर सोबत स्वतःच्या कार मध्ये नेत बिअर मध्ये विषारी पदार्थ मिसळून तो बिअर बारच्या आत आला व विषारी बियर ग्लास मध्ये ओतली व त्या विषारी बियरचा अर्धा ग्लास पिला विषारी बिअर पिल्याने त्याला अशक्तपणा भासू लागले प्रकृतीत बदल पाहता त्याने मित्राला फोन केला व मित्राला तात्काळ ये माझी प्रकृती बरी नाही बोलत मित्राला बोलवून घेत तो लक्की बार येतून निघून गेला परंतु उर्वरित विषारी बिअरने भरलेला ग्लास तिथेच टेबल वरती होता लक्की बार मधील वेटर काम करणारा भगवान गेडाम हा टेबल साफ करायला गेला त्याला तो विषारी बिअर ने अर्धा भरलेला ग्लास दिसला त्याने बघितले ह्या टेबलवर्ती कुणी नाही पाहता त्याने तो विषारी बिअरने भरलेला ग्लास घेतला व पिला विषारी बिअर पिल्याने भगवान गेडाम याचा काही क्षणात मृत्यू झाला लगेच राजुरा पोलीस याने लक्की बार गाठले व घटनास्थळी असलेला तो विषारी ग्लास व त्यातील काही बिअर चाचणी करीता समोर पाठविले समोरील तपास राजुरा पोलिस करीत आहे.