राजुरा येथे पहिली संविधान शाखा व राजर्षी शाहू महाराज जयंती

Mahawani


लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(२४ जून २०२३)

        सोमवार दि 26 जून 2023, सकाळी 7.30 वा. स्थळ : फिरोजशहा आर्केड गार्डन , राजुरा मित्रांनो भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क अधिकाराने आज देशातील सर्व सामान्य माणूस स्वातंत्र्य समता, बंधुता, धर्म निरपेक्षता या मानवीय गोष्टीचा उपभोग घेतो आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संविधानाचे महत्व लक्षात घेता संविधानातील गोष्टींचे जागरण होणे गरजेचे आहे. या दृष्टीने चंद्रपुरात 12 नोव्हे 2021 पासून सणवीस शाखेच्या माध्यमातून संविधान जागरण सुरु आहे. राजुरातील नागरिकांना ही या संधीचा लाभ घेता यावा म्हणून येत्या 26 जून 2023 ला राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त राजुरा येथे संविधान शाखेचे आयोजन सकाळी 7.30 ते 9 वाजे दरम्यान केले आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी मा. बळीराज धोटे, मुख्य संघटक सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट तथा ओबीसी जनगणना समन्वय समिती व त्यांचे सहकारी विशेषत्वाने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.


To Top