लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
भारतीय बौद्ध महासभेच्या "बौद्धाचार्य" परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थानावर
भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभाग च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच वेळेस मार्च 2023 मध्ये"बौद्धाचार्य" ची लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्याचा निकाल दि 22 जून 2023 ला जाहीर झाला.
दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून "बौद्धाचार्य" ची निर्मिती झाली. बौद्ध धम्माचा प्रचारक,बौद्ध धम्माचा संस्कारविधी कर्ता म्हणून भारतीय बौद्ध महासभा ने यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे. याकरिता 10 दिवस श्रामनेर बनणे ही एक महत्त्वाची अट आहे. त्यानंतर ही बौद्धाचार्य ची परीक्षा द्यावी लागते.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो बौद्धाचार्य (आदर्श बौद्ध धम्म प्रचारक)बनतो.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभाग च्या वतीने दीक्षाभूमी चंद्रपूर येथील केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 254 परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी दोन 204 पास झालेत. 23 मेरिट मंध्ये,66 प्रथम श्रेणीमध्ये तर 73 द्वितीय श्रेणीमध्ये पास झालेत आणि 52 परीक्षा मध्ये नापास झालेत.
या परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्या पश्चिम मधील आद शेषराव सहारे सर सर्वात जास्त गुण 200 पैकी 175 प्राप्त करून महाराष्ट्र मंधून प्रथम स्थानावर आहेत, आद किशोर तेलतुंबडे साहेब तिसरा क्रमांक तर आद बादल चांदेकर चौथा क्रमांक आणि आनंदराव जांभुळकर पाचवा क्रमांक वर आहेत.संपूर्ण महाराष्ट्रातून पाच पैकी चार क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभाग ने स्थान मिळविले.तसेच 8 मेरिटमध्ये तर 6 प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत.असे एकूण 18 पास आहेत.
1)आद शेषराव सहारे
2)आद किशोर तेलतुमडे
3)आद बादल चांदेकर
4)आदआनंदराव जांभुळकर
5)आद ऋषी नगराळे
6)एड रमण पुणेकर
7)आद शंकर वेल्हेकर
8)आद गुरुबालक मेश्राम
9)आद उत्तम पारेकर
10)आद तुळशीराम शेंडे
11)आद धर्मुजी नगराळे
12)आद आयुष्य खोब्रागडे
13)आद श्रावण जीवने
14)आद जगदीश आघात
15)आद रमेश वर्धे
16)आद राकेश रंगारी
17)आद सुधाकर सुमोटकर
18)आद बंडूजी वाकडे
19)आद के.व्ही.गजभिये.
या अगोदर चैत्यभूमी मुंबई येथे घेण्यात आलेल्या "केंद्रीय शिक्षक" परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्हा पश्चिम मधून 50 पैकी 6 केंद्रीय शिक्षक उत्तीर्ण झालेत तर केंद्रीय शिक्षिका परीक्षा मंध्ये 50 पैकी 10 उत्तीर्ण झालेत. महाराष्ट्र मधून पहिला,दुसरा स्थान मिळवून चंद्रपूर जिल्हा पश्चिम चे नाव लौकिक केले.
या एक वर्ष मंध्ये चंद्रपूर जिल्ह्याला 18 केंद्रीय शिक्षिका,6 केंद्रीय शिक्षक आणि 18 बौद्धाचार्य मिळालेले आहेत. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) च्या माध्यमातून सुरू असलेल्या विज्ञानवादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्याला खूप मोठा वेग येईल आणि चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेचे कार्य खूप मोठ्या प्रमाणात होईल असे मला वाटते.
सर्व नवीन केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि बौद्धाचार्य चे भारतीय बौध्द महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभाग, तालुका शाखा, शहर ,ग्राम, वॉर्ड शाखाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा....