(KCR) के. चंद्रशेखर राव मंत्रीमंडळासह २७ जूनला विठ्ठलाच्या दर्शनस पंढरपुरात !

Mahawani



लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(२६ जून २०२३)


         (BRS) भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री  केसीआर  के. चंद्रशेखर राव (KCR)  हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे औचित्य साधून के. चंद्रशेखर राव हे त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरात विठ्ठलाचे दर्शन घेण्या करिता येत आहे . त्यांचा दौरा अधिकृतपणे निश्चित झाला आहे. चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळ आणि सहकारी आमदार-खासदारांसह २७ जून रोजी सकाळी हैदराबाद येथून मोटारीने सोलापूरकडे रवाना होतील. व सायंकाळी सहा वाजता सोलापुरात दाखल होतील. के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या बीआरएस (BRS) पक्षाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्ते त्यांच्या स्वागताची तयारी जलोशाने करती आहे. राव यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स, जाहिराती लावल्या आहेत. तसेच आमदार, खासदार यांच्या निवासाची व्यवस्था देखल मोठ्या प्रमाणत  केली आहे.

To Top