सुधीरभाऊच्या कार्याला रामपुर वासीय प्रेरित होऊन ९० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Mahawani


 राजुरा येथे २१० रक्तदात्यांनी केले रक्तदान


हावाणी - विरेंद्र पुणेकर

    राजुरा : लोकप्रिय नेते, विकास पुरुष राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार राजुऱ्याच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित २१० रक्तदात्यांनी केले रक्तदान. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली केले. 

या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट म्हणजे रामपुर येथिल सरपंच वंदनाताई गौरकार तथा इतर कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात रामपुर येथिल ९० युवक, युवती, नागरिक व महिलांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रामपुर ग्रामपंचायत राजुरा नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला प्रेरित होऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले आहे. रामपुर येथिल नागरिक पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याबद्दल मोठे आशावादी असून या रक्तदान शिबिरात बहुतांश रक्तदाते रामपुर या गावातील आहे.

या रक्तदान शिबिराला माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ऍड. संजय धोटे, भाजपा नेते अरुण मस्की, उपाध्यक्ष सतिष धोटे, चूनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, महादेव तपासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, नामदेव गौरकार, राकेश हींगाने, नवनाथ पिंगे, हरिदास झाडे, मिलिंद देशकर, रामपुर सरपंच वंदना गौरकार, मंगला सोनेकर, सुनीता उरकुडे, महादेव तपासे, दिलीप वांढरे, संदीप गायकवाड, प्रशांत घरोटे, विनायकराव देशमुख, राजकुमार भोगा, सचिन शेंडे, सुरेश रागीट, वामन तूरानकर, प्रदीप पाला, मंगेश श्रीराम, संदीप पारखी, बादल बेले, शिवा बोंकुर, शंकर सोनेकर, मंजुषा अंमुलवार, सुमा आफरिन, भाऊराव चंडनखेडे, अनिल दुबे, पराग दातारकर, रवी बुरडकर, बाबुराव जीवने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top