राजुरा: बाबापूर-राजुरा मार्ग पुन्हा पुराने बंद झाल असून सतत पाण्याच्या वाढत्या स्रोताने कढोली, बाबापूर, मानोली, गावाचे संपर्क तुटले आहे. कढोली, बाबापूर, मानोली राजुरा ला जोडणारा मार्ग गोवरी कॉलोनी वरून सास्ती होत राजुरा जातो ह्या मार्गात खूप काळा आधीचे बनलेले जुने पुले आहेत. यातील मानोली-बाबापूर गोवरी कॉलोनी मार्गात येत असलेले पिल जीर्ण अवस्थेत असून पुलाची उंची जमिच्या उंचीवरून खाली गेली असल्याने प्रत्येक पावसाळ्यात सदर पूल पाण्या खाली येत असते. व मार्ग बंद होते मानोली- बाबापूर वरून राजुरा जाण्याचा एकमेव मार्ग असल्याने प्रत्येक पावसाळ्यात सदर गावातील नागरिकांची कोंडी होते. शाळेतील विध्यार्थ्यांना, रोजच्या कामाला जाण्याचा एकमेव मार्ग असल्याने सदर पूल तातळीने उंची मोठी करत नवीन वायला हवे असे कित्तेक वर्ष पासून बाबापूर-मानोली वासियांचे मनने आहे. या संदर्बत शासनाला वेळो - वेळी सूचित करून देखील सदर मार्गा कळे व शेत्राकळे शासनाचे लक्ष नाही फक्त विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागल्या त्याच वेळी आम्ही मोठ्या नेत्यांना पाहतो त्या वेतिरिक्त कुठल्याहि वेगळ्या प्रसंगी कुठलाहि नेता शेत्रकळे फिरून पाहत नाही असे दोन्ही गावातून बोलले जात आहे. तसेच सदर मार्गाने येत असलेला गोवरी कॉलोनी पूल देखील याच परिस्थिती मध्ये दिसून येत आहे हा हि पूल त्याच पद्धतीने जीर्ण झाला असून पुलाची उंची सदर मार्गा पेक्षा कमी झाली आहे. वर्षानो वर्ष रस्त्याचे काम होतात त्याने तो रस्ता पुन्हा उंच होत जातो परंतु पुलाचे काम एकदा झाले की त्याच्या कळे बघितले जाता नाही या कारणाने तो पूल पुन्हा - पुन्हा उंचीने खालावतो उंची खालावल्याने व रस्ते उंचावल्याने पाणी पुलावरून सतत वाहत असते आणि काही प्रमाणता पाणी आला की मार्ग बंद होत व वाहतूक करणार्याची कोंडी होते. तसेच वैधकीय सुविधा देखील अशा वेळी गावात पोहचू शकत नाही जेव्हा की वैधकीय सुविधेची आवशक्ता जास्ती असते. तसेच काही गावांना पर्यायी मार्ग नाही जी गावे चारी बाजूने वे. को. ली. च्या मातीच्या धीगाराने व्यापले आहे. अशा गावांना तात्काळ पर्यायी मार्ग देण्यात यावे. अशा समस्या कित्तेक गावात निर्माण झाल्या आहे तरीहि प्रशासन या कळे दुर्लक्ष करीत आहे. वरील समस्या वरती वेळीस उपाययोजना करावी अशी मांग सदर शेत्रातून होत आहे.
पुन्हा बाबापूर - राजुरा मार्ग बंद
जुलै २८, २०२३
महावाणी - विरेंद्र पुणेकर
२८ जुलै २०२३
अन्य ॲप्सवर शेअर करा