(१० जुलै २०२३)
शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने तसेच श्री किरणभाऊ पांडव शिवसेना पूर्व विदर्भ सपर्क प्रमुख, नागपूर यांचे सूचनेनुसार माननीय नितीनभाऊ मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपुर यांचे नेतृत्वात जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांचे मुख्य पुढाकाराने भद्रावती शहरातील गवराळा वार्डातील असंख्य युवकांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना श्री नितीन मत्ते यांनी युवकांचे राष्ट्राच्या उन्नती मध्ये काय स्थान आहे? हे सर्व युवकांना पटवून देवून शिवसेना वाढी मध्ये युवकांचा मोठा हातभार कसा लागेल, याचे देखील यथोचित्त मार्गदर्शन श्री नितीन मते यांनी केले.माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी युवकांचं मोठं योगदान अभिप्रेत आहे .त्यासाठी माननीय किरण भाऊ पांडव हे अहोरात्र मेहनत घेत असून त्यांच्या या मेहनतीला आपल्याला साथ द्यायची आहे, असे आवाहन युवकांना नितीनभाऊ मत्ते यांनी केले. यावेळी श्री मनीष बुच्चे व श्री प्रथम गेडाम यांचे नेतृत्वात असंख्य युवकांनी शिवसेनेमध्ये माननीय नितीन भाऊ मते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भद्रावती शहराचे शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश केला. यावेळी भद्रावती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री शंकर भाऊ पांडे श्री कमलाकांजी कळसकर श्री चेतनजी घोरपडे, अर्पित कुमरे,अक्षय आस्कर,दिनेश चिंचोलकर,सुधीर सावंनकर,अजय क्षिरसागर,तरुण आत्राम,ओमकार बुच्छे, रोशन बदखल व अनेक युवक शिवसैनिक उपस्थित होते