दिव्यांगाना तीन चाकी सायकलचे वितरण

Mahawani

        



शिवानी महिला मंडळ, झंकार महिला मंडळ व वेकोली मुख्यालय नागपूर चा संयुक्त उपक्रम.

ऍड. इंजि. प्रशांत घरोटे यांच्या प्रयत्नातुन व दिलीप गिरसावळे, बाळू वडस्कर यांच्या पाठपुराव्याने दिव्यांगाना मिळाला आधार.



महावाणी - विरेंद्र पुणेकर
20 जुलै २०२३

        राजुरा: भारतीय जनता पार्टीचे राजुरा तालुका महामंत्री ऍड. इंजि. प्रशांत घरोटे Prashant Gharote यांच्या प्रयत्नातुन व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव दिलीप गिरसावळे, Dilip Girsawade चुनाळा ग्रामपंचायत चे सरपंच बाळा वडस्कर यांच्या पाठपुराव्याने शिवानी महिला मंडळ, Shiwani Mahila Mandal बल्लारपूर, Ballarpur झंकार महिला मंडळ,  व WCL Headquarters Nagpur
 वेकोली मुख्यालय नागपूर चा संयुक्त उपक्रम.वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या माध्यमातून तालुक्यातील मूठरा, कडोली, चुनाळा  या गावातील दिव्यांगाना तीन चाकी सायकल चे वाटप करण्यात आले. श्रावण महिन्यातील सावन झुला या कार्यक्रमा निमित्याने  वेकोली मुख्यालय नागपूर आणी विविध क्षेत्रीय कार्यालय, महिला पदाधिकारी तसेच मुख्य महाप्रबंधक बल्लारपूर श्री. सव्यसाची डे  यांच्या प्रमुख उपस्थितीमधे सदर सायकल वितरित कारण्यात आल्या. याप्रसंगी सचिन जगताप रा. मुठरा, निखिल हिंगाने रा. कडोली, शैलू कार्लेकर रा. चुनाळा या लाभर्त्यांना सायकल भेट देण्यात आल्या. त्यांनी वेकोली प्रशासनाचे व शिवानी महिला मंडळ, बल्लारपूर, झंकार महिला मंडळ यांचे विशेष आभार मानले. वेकोली तर्फे दिव्यांगाणा दिलेल्या या तीन चाकी सायकल भेटीबद्दल भारतीय जनता पार्टी BJP च्या पदाधिकारी यांनीही आभार व्यक्त केले.




To Top