Rajura: पुरामुळे मानोली आणि आजूबाजूच्या गावाचे संपर्क तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Mahawani

मुसळधार पावसामुळे मानोली व बाबापूर गावांचा संपर्क तुटला; नागरिक भयभीत

  • महावाणी: विर पुणेकर
राजुरा: चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा तालुका व जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. धरनाचे दार उघडल्यामुळे पाण्याचा स्तर वाढला असून मानोली, बाबापूर, गोवरी, कढोली व इतर आसपासच्या गावांतील नागरिक भीतीत आहेत. मानोली-बाबापूर या गावांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की सकाळी  ११ वाजेपर्यंत मोकळा असलेला मार्ग दुपारच्या सुमारास पूर्णपणे बंद झाला आहे. Rajura 


मानोली गावातील नागरिकांनी सांगितले की, या वर्षी पाण्याची धाव मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी वे.को.ली. (वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड) मार्फत तयार केलेल्या मातीच्या ढिगारांचा मोठा प्रभाव आहे. मानोली-बाबापूर हे गाव वे.को.ली.च्या कार्यक्षेत्राने चहूबाजूंनी व्यापलेले असून मातीच्या ढिगारांमुळे पाणी गावाकडे वळले आहे, ज्यामुळे गावात पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. 


आरोग्य सेवांचे आव्हान

गावात पाण्यामुळे मुख्य मार्ग बंद झाला असून पर्यायी मार्गाची व्यवस्था नसल्यामुळे आरोग्य सेवांमध्ये अडचणी येत आहेत. जर एखाद्या नागरिकाला आरोग्याची तातडीची गरज भासली, तर तो कुठेही जाऊ शकत नाही. मानोली गावात काही गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव गमवण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Rajura 


वे.को.ली.च्या उपाययोजनांची मागणी

मानोली-बाबापूर हे गाव वे.को.ली. मार्फत दत्तक घेतलेले आहे, परंतु या आपत्तीच्या परिस्थितीत वे.को.ली. मार्फत कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. नागरिकांनी अनेकदा पत्रव्यवहार करून समस्यांकडे लक्ष वेधले, परंतु अद्याप कोणतीही ठोस कृती झालेली नाही, असे मानोली व बाबापूर येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.


गावातील नागरिकांच्या मते, पुरामुळे आरोग्य सेवा पोहोचवणे आणि जीवन जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग देण्याची मागणी जोर धरत आहे. शासनाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देत पर्यायी मार्ग तयार करावा, अशी मागणी होत आहे. 


इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे आमचे संपूर्ण गाव वेढले गेले आहे. जीवनावश्यक गोष्टींची कमतरता भासत असून आरोग्यसेवा मिळवणेही अशक्य झाले आहे. परिस्थिती नाजूक आहे, प्रशासनाने लवकरात लवकर मदत पोहोचवावी अशी आमची मागणी आहे. - खुशाल अडवे, गाववासी


#Rajura #Mahawani, #MahawaniNews, #MarathiNews, #बातम्या, #महावाणी, #ChandrapurFlood, #ManoliFlood, #WCLImpact, #FloodRelief, #RajuraNews, #GadchandurFlood, #MaharashtraFloods, #FloodSafety, #ChandrapurDistrict, #FloodEmergency, #FloodedRoads, #MaharashtraNews, #HeavyRainfall, #FloodImpact, #FloodPreparedness, #VillagesUnderWater, #FloodedVillages, #WCLMiningImpact, #FloodRescue, #ManoliUpdates, #RajuraFlood, #FloodReliefWork, #TalukaUpdates, #RescueOperations, #FloodAffectedAreas, #VillageConnectivity, #FloodSafetyMeasures, #FloodPanic, #EmergencyServicesBlocked, #MaharashtraWeather, #WCLResponsibility, #ManoliDisaster, #FloodsInIndia, #FloodAlert, #LocalNewsUpdates, #DisasterManagement

To Top