लसीकरणा बाबत वेळो-वेळी माहिती देणारा अप्लिकेशन
चंद्रपूर : आरोग्य मंत्रालय व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ ऑगस्ट २०२३ पासून संपूर्ण देशभरात 'यू विन' (U-WIN) पोर्टल सुरु केले जाणार आहे. यामध्ये नियमित लसीकरण कार्यवाहीत अधिक सुधारणा केली जाणार आहे. लसीकरणाचा रिमाइंडर मोबाइल अप्लिकेशन मिळणार असल्याने मुलांना लसीकरण करण्यासाठी पालकांना लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. तसेच माता बाल संगोपन कार्ड जपूनही ठेवावे लागणार नाही. 'यू विन' पोर्टलवर मुलांसाठी तसेच मातांसाठी सर्व प्रकारच्या लसी मिळविण्याबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. यातून गरोदर महिला व नव शिशु यांन सोबत होणार्या गैरसोई लसीकर्नाबाबत माहिती इत्यादी गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या लसी या अप्लिकेशनच्या माध्यमातून अचूकपने लसीकरन होण्यास मदत होईल व सर्व प्रकारच्या लसीकर्नाबाबत माहिती सदर अप्लिकेशन मध्ये नमूद केल्याने कुठलीही निष्काळजीपणा होणार नाही असे अप्लिकेशन बनवणाऱ्या चमूने स्पष्ठ केले आहे.
मुलांना आवश्यक असलेल्या लसी
* घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ (पक्षाघात) आदी रोग प्रतिबंधक लसी दिल्या जातात. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक आहे.
* प्राथमिक आरोग्य केंद्रात या लसी मोफत मिळतात. या व्यतिरिक्त अन्य लसींचा सुद्धा समावेश आहे.
गरोदर महिलांना आवश्यक असलेल्या लसी
* धनुर्वात प्रतिबंधक लस इत्यादी