समान नागरी कायद्यावर ऍड. प्रकाश आंबेडकरांचे मोदी सरकारला आवाहन

Mahawani


महावाणी - विरेंद्र पुणेकर

    ऍड. प्रकाश आंबेडकरांनी balasaheb aambedkar समान नागरी कायद्या बाबत माध्यमाशी बोलताना समान नागरी कायद्याची सखोल मांडणी करतांनी ते बोलत होते देशाचे पंतप्रधानांनी मध्यंतरी घोषणा केली होती की नवीन पार्लमेंट येन्या आगोदर समान नागरी कायदा लागू करनार. अनेक राजकीय पक्षांना भारतीय कायदा आयोग Law Commission of India च्या मैल आले की आपल्या मतांची मांडणी करा भारतीय कायदा आयोगाला राजकीय पक्षा कडुन उलट विचारण्यात आले की राजकीय पक्षांनी कशावर्ती अभीप्राय द्यायचा हे आधी कळवा नंतर आम्ही आमचे अभीप्राय कळवू मुळात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार नाही मसुद्या विना पतंप्रधान समान नागरी कायद्याची घोषणा करतात समाना नागरी कायद्यचा मसुदा तयार करण्याचा एके काळी डॉ. बाबासाहेबांनी जबाबदारी घेत‌ली होती पन त्यावेळच्या मंत्रीमंडळात चर्चेत सर्वात किचकट प्रश्न होता तो हिंदु समाजामधे विवाह दोन पद्धतीने पार पाडले जाते ब्राम्हन, शत्रीय यांचा विवाह हा होम, हवन आणि सप्तपदी विधीने होतो. आणि वैश्य, शुद्र, अती शुद्र आणि आदिवासी यांचा विवाह अंतरपाठ पद्धतीने पार पाडले जाते तर या दोन्ही विवाहाची पद्धत वेगळी आहे जेव्हा समान नागरी कायदा अमलात आणायचा म्हटले आणि एकत्रीत करायचे महले तर या दोन्ह विवाह पद्धती मधली एक विवाह पद्धत स्वीकारावी लागेल. विवाह हा सर्व सामान्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्या मुळे हि जे घाई चाललेली आहे ही घाइ हिंदु समाजातच भांडण लावनारी दिसुन येते. अखेर मान्यता कोणत्या विवाहाला द्यायची अंतरपाठ किव्हा सप्तपदी याला मुळ विवाह पद्धत मानवी हा मोठा प्रश्न आहे. आज मोदींनी समान नागरी कायद्याच्या घोषणा दील्या परंतु हा जो विवाहाचा प्रश्न हिंदू समुदायामध्ये पडला आहे तो मोदी यांनी एकमत करून हिंदू समुदायाला अजूनही सांगितलेला नाही असे दिसुन येत आहे. आणि या मुळे तो मसुदा देखील समोर आनु शकत नाही अशी परिस्तिथी आहे. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडनुका लक्षात घेता आता त्याच्या कड़े कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. या कारणामुळे भाजप सरकारने समान नागरी कायद्याची चर्चा सुरु केली असे दिसुन येत आहे RSS हे हिंदु समाजाचे कैवारी आहे असे सांगतात त्याना माझे आवाहन आहे की या दोन विवाह पद्धती पैकी आपण कुठल्या विवाह पद्धतीला मान्याला देत आहात हा खुलासा जनते समोर करावा. आणि राजकीय वर्तुळातून जी चर्चा सुरवात करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करू पाहत आहे त्याला आमचे आवाहन आहे की आम्ही चर्चा करायला तयार आहो तुमचा मसुदा पहीले लोकान समोर आणा आपल्या मनातील भावना आधी कागदावर्ती येउद्या आपले विचार लोकांना समजूद्या मग आम्ही आमची प्रतीक्रीया द्यायला मागे सरणार नाही या वर्ती RSS ला चर्चा करायची असल्यास RSS ने पहील्यांदा समान नागरी कायद्याचा मसुदा नागरीकांन समोर करावा असे आवाहन करतो असे माध्यमाशी बोलतानी प्रकाश आंबेडकरांनी वर्तवले. 

सविस्थर विडीओ पाहण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊ शकता:-
https://www.youtube.com/watch?v=mch3pX0Zdmo





To Top