सि.टी.पी.एस. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कामगार आयुक्ताकडून कल्याण अधिकाऱ्याला तात्काळ अंमलबजावणी करण्याची ताकीद!

Mahawani


महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेने दिलेल्या साखळी उपोषणच्या इशाराला यश..! 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
12 ऑगस्ट २३

    चंद्रपुर :- येथील सि.टी.पी.एस. मध्ये गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचे शोषण केले जात असून अनुक्रमे 1 ते 25 कामगारांच्या मागण्यासंदर्भात निवेदन देवून मागण्या मान्य न झाल्यास दि.10 ऑगस्त 2023 पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिल्याने चंद्रपुर कामगार आयुक्त मड़ावी यांनी सदर बाबींची दखल घेत आपल्या कार्यालयात सि.टी.पी.एस.चे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपुर शिवसेना सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे, संस्थापक सचिव तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, यूनिट अध्यक्ष संतोष ढोक व यूनिट पदाधिकारी यांच्यात बैठक घेवून सि.टी.पी.एस.चे कल्याण अधिकारी वंजारी यांना सि.टी.पी.एस. कामगारांच्या मागण्यासंदर्भात वरिष्ठामार्फत परवानगी मिळवुन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देवून उर्वरित मागण्या सि.टी.पी.एस. कार्यालयात सोडवण्यात येण्याचे निर्देश देण्यात आले.

         (ctps) सि.टी.पी.एस.मध्ये सर्व कंत्राटदार व अधिकारी अनेक वर्षापासून जवळपास अर्ध्या कामगारांकडून कामे करुन घेवून आर्थिक स्वार्थ साधणे, स्थानिकांना कंत्राट व रोजगार न देता बाहेरील लोकांना प्राधान्य देवून करोडोचे कंत्राट ज्याला त्यालाच इन्क्वायरीमार्फत आर्थिक स्वार्थ साधणे, कामगाराचा मृत्यु वारसाला झाल्यास 20 लाखाची आर्थिक मदत, सि. एस. आर. फंडातून 5 लाख, निवृती झाल्यावर 10 लाख  व पाल्यास नौकरी, किमान वेतन नुसार पगार, पि. एफ. नियमित भरणे, ई. एस. आय. सर्व कामगारांना देणे, फौजदारी गुन्हे दाखल कंत्राटदार कामे देण्यात येवू नये, कंत्राटदार कामे करण्यात वाढिव मुदत देवू नये, 12 ते 15 वर्षापासून अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात याव्यात, कामगार जॉब सिक्योरिटी देण्यात यावी, ज्याठिकाणी काम आहे त्याजागेवरुन इतरत्र कामे करण्यास बळजबरी करणे, कामगार सांस्कृतिक सभागृह व मुलांना शैक्षणिक मेळावे, मोटरसायकल व मोबाइल बंदी करू नये, सकाळी कामावर जाताना गर्दीबाबत उपाय योजना अशा अनेक कंत्राटी कामगारांच्या समस्याबद्दल सविस्तर चर्चा करुन कामगार आयुक्त यांच्या कडून त्यांच्यामार्फत व सि. टी. पी. एस. कल्याण अधिकारी यांनी आपल्या कार्यालय बाकी मागण्या तात्काळ मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपुर शिवसेना सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे, संस्थापक सचिव तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, यूनिट अध्यक्ष संतोष ढोक, उपाध्यक्ष जगदीश सहारे, सचिव आशिष गोमासे, सहसचिव वैभव सोनकुसरे,राजू रायपुरे व कामगार  उपस्थित होते.

To Top