डॉ. प्रकाश गेडाम यांची खोटी तक्रार करुन मानसिकता ख़राब करण्याऱ्या त्या राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यावर कार्यवाही करा!
शिवसेना वैद्यकीय कक्ष, जिल्हा प्रमुख श्री.अरविंद धिमान, ( arvind Dhiman ) यांची चंद्रपुर जि.प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांना निवेदनाद्वारे मागणी!
२९ ऑगस्ट २३
चंद्रपुर :- येथील दुर्गापुर प्रा. आ. केंद्र इथे नव्याने रजु झालेले वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश गेडाम Dr. Prakash Gedam (M.B.B.S.) यांचे विषय खोटी तक्रार करुन मानसिकता ख़राब करण्याऱ्या एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकारी यांनी चंद्रपुर जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांना केल्याच्या संदर्भात शिवसेना वैद्यकीय कक्ष, जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, तालुका संघटक संजयकुमार शिंदे, विभाग प्रमुख मुक्कदर बावरे यांनी प्रत्यक्ष भेट घेवून खोटी तक्रार करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.
दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बदली होवून रुजू झालेले वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश गेडाम यांच्या विरोधात ते उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाशी चांगली वागणुक करित नाही व वेळेवर प्रा.आ. केंद्र मध्ये उपस्थित राहत नाही. अश्याप्रकारची हेतुपुरस्कर लोकांच्या तोंडी तक्रारी आहेत असे पत्र राजकीय लेटरवर देवून चंद्रपुर जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांच्यावर दबाव आणत असल्याचे निदर्शात येत आहे.
त्यामुळे त्यांना सदर बाब निदर्शात यावी,म्हणून सदर आरोप हेतुपुरस्कर राजकीय द्वेषापोटी घाई घाईने करण्यात आले असून वास्तविक पाहता मागिल दोन महिन्यापासून डॉ. गेडाम हे आल्यापासून त्यांची उपचार पद्धत व उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाशी आपुलकीची वागणुक देत आहेत. दोन महिन्यातच त्यांनी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाचे मने जिंकलीत व ते आपले कर्त्यव्य योग्य रीतिने पार पाडत आहेत.
अशा जवाबदार अधिकाऱ्याला मानसिक त्रास देऊन त्यांचे मनोबल खच्चीकरण करणाऱ्या माजी राजकीय पदाधिकारी यांच्यावर तात्काळ चुकीची माहिती दिल्याबद्दल त्यांची संबंधित वरिष्ठाकड़े कार्यवाहिस प्रकरण पाठवण्याची मागणी शिवसेना वैद्यकीय कक्ष, जिल्हा प्रमुख अरविंद धिमान यांनी चंद्रपुर जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांना निवेदनाद्वारे केली अन्यथा शिवसेना पक्ष आपल्या स्टाइलने उत्तर देण्यास सक्षम राहील. असा इशारा देखील देण्यात आला.