राजुरा: काल रात्रो ११:१० च्या सुमारास बजरंग दल, राजुरा मार्फत कत्तलीला नेत असणाऱ्या ६ जनावराची सुटका करणायत आली बजरंग दलला सुत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार कत्तलीला नेत असणाऱ्या वाहन क्र. MH-34-BG-4638 हे वाहन कत्तली करिता जनावरांना घेऊन सुसी दाबगाव येथून चिखली पठाण जात असल्याची माहिती मिडाली असता वाहनाला जेरबंद करण्या करिता बजरंग दलाने पंचायत समिती, राजुरा येथे आपला घात मांडला होता रात्रो ११:१० सुमारास दाबगाव मार्गा वरून राजुरा येत असणारे वाहन क्र. MH-34-BG-4638 हे वाहन त्यांच्या नजरेस पडले त्वरित वेळ नगमावता सदर वाहनाला रोकून त्याची विचारणा करण्यात आली समोर आलेल्या माहिती नुसार स्पष्ठ झाले की सदर वाहनातील जनावरे हे कत्तली करिता नेण्यात येत होते. माहित होताच राजुरा पोलीस यांना माहिती देण्यात आली व वाहन चालका सह वाहन व जनावरांना राजुरा पोलीस यांना सोपवण्यात आले समोरील कार्यवाही राजुरा पोलीस करीत आहे.
कत्तलीला नेत असणाऱ्या ६ जनावराची मुक्तता
ऑगस्ट १५, २०२३
१५ ऑगस्ट २३
अन्य ॲप्सवर शेअर करा