सास्ती-धोपटला पेट्रोल पंपा समोर भीषक अपघात तिघांचा जागीच मृतू तर दोन जखमी

Mahawani
महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ ऑगस्ट २३

    सास्ती: सास्ती राजुरा मार्गाने येत असलेल्या धोपटला गावा जवळील झवेरी पेट्रोल पंप जवळ भीषण अपघातात एकाच घरातील तिघांचा जागीच मृतू सदर अपघात सायंकाळी ७: १० च्या सुमारास झाला असून मृतकांन मध्ये निलेश वैध (३५) त्यांची पत्नी रुपाली (३०) व त्यांची ३ वर्षाची मुलगी हे चंद्रपूर येथून आपल्या राहत्या घरी धोपटला कॉलोनी येते जात असताना भर वेगात येत असणाऱ्या अज्ञात ट्रक ने धडक दिल्याने तीघांचा जागीच मृतू तर काही अंतरावर सदर अज्ञात ट्रकने पुन्हा एका दुचाकी वाहना धडक दिली असून धडकेत प्रसाद तगरपवार, प्रतीक्षा तगरपवार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारा करिता चंद्रपूर येथे हालवण्यात आले आहे. 

To Top