स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर शिवसेना शहर शाखा वरोरा तर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन मते (Nitin Matte) यांच्या मुख्य उपस्थितीत आदर्श बहुउद्देशीय संस्था वरोरा द्वारा संचालित परिवर्तन मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह वरोरा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले .श्री राजेश भाऊ डांगे शिवसेना शहर प्रमुख वरोरा हे नेहमीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य असे अनेक नानाविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात . त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना शहर शाखा वरोरा तर्फे परिवर्तन मागासवर्गीय वसतिगृह वरोरा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूभाऊ लभाने, प्रमुख पाहुणे श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, शिवसेना शहर प्रमुख वरोरा श्री राजेश भाऊ डांगे,श्री वैभव जी पावडे, वस्तीगृहाचे मुख्य कार्यवाहक श्री बडवाईक सर, पोपटकर मॅडम, अड . हिवरकर, अड. नकवे, अड . साळवे, डॉ. धांडे, डॉ पिसे, प्रदिप लभाने ववसतीगृहाचा कर्मचारी वर्ग शालेय विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्वातंत्र्य दिनी शिवसेना शहर वरोरा यांचे तर्फे शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
ऑगस्ट १५, २०२३
अन्य ॲप्सवर शेअर करा