मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा शिवसेना चंद्रपूर जिल्हा निरीक्षक सुनिल भाऊ चौधरी यांचे पदाधिकारी यांना आवहन

Mahawani


महावाणी - विरेंद्र पुणेकर

चंद्रपुर: येथील सार्वजनिक बांधकाम विभाग VIP गेस्ट हाऊस , चांदा क्लब ग्राउंडजवळ दि.06/08/2023 रोज रविवारला मा . किरणभाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सूचनेनुसार शिवसेना चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक शिवसेना चंद्रपूर जिल्हा निरीक्षक  सुनील चौधरी यांचे मुख्य उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीला उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना संबोधित करतांना निरिक्षक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष वाढी संदर्भात समाधान व्यक्त करून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांचे नेतृत्वात जिल्ह्यामध्ये शिवसेना ही वाढत असून गोरगरीब जनतेच्या कामांमध्ये या जिल्ह्यातील शिवसैनिक स्वतःला झोकून देत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी, गोरगरीब, मजूर, बेरोजगार, समाजातील प्रत्येक घटकाला सरकारच्या माध्यमातुन लाभ मिळवून देवून त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकडे देखील लक्ष्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांच्या प्रयत्नाने जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे नेत्तृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक कार्यकर्त्ते शुभम जुमड़े, मुकद्दरसिंग बावरे, अमोल टोंगे, मनोज नागरकर, विक्की महाजन, सुरेश खापरडे व बल्लारपुरचे शेख जमील शेख सब्बर, मनजीतसिंग उर्फ मंगा पुट तसेच भद्रावती उपतालुका प्रमुख सुंदरसिंग बावरे यांचे प्रयत्नाने भद्रावती तालुक्यातील चालबर्डी ( रै) ग्रामपंचायतचे दोन सदस्य श्री अंकित बावणे व श्री अमोल कोवे यांनी मा सुनिलभाऊ चौधरी यांचे उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून सर्व तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडी तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांनी बुथ प्रतिनिधी व शिवदूत येत्या दहा दिवसात नेमून प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची शाखा झालीच पाहिजे,अशी आग्रहाची विनंती उपस्थित सर्व पदाधिकारी यांना करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी सर्व तालुका प्रमुखांना सूचना देऊन सदस्य नोंदणी फॉर्म व बुथ प्रतिनिधी, शिवदूत सदस्य नेमून येत्या दहा दिवसात फार्म भरून जिल्हाप्रमुखाकडे जमा करावे असे आवाहन सर्व उपस्थित पदाधिकारी यांना केले . यावेळी अनेकांनी  मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष वाढीसंदर्भात मार्गदर्शन व सूचना चाणक्य विभागाचे टीमने केल्या .  आरोग्य विभागा संबंधित प्रश्नावर जनतेच्या मदतीसाठी वैद्यकीय कक्ष त्याचबरोबर सर्व शिवसैनिक यांनी 24 तास उपलब्ध असावे असं आव्हान सुद्धा यावेळी करण्यात आले . या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा हा समाधानकारक असून जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी आता परिश्रम करावे अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या . यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख बंडूभाऊ हजारे, युवा सेना कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे, वैद्यकीय मदत कक्षाचे डाखोरे, मुख्यमंत्री जनकल्याण विभागाचे कमलेश बारस्कर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख, योगिता लांडगे, युवासेना जिल्हाप्रमुख सूर्या अडबाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा भद्रावती शहर प्रमुख आशिष ठेंगणे, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, उपजिल्हाप्रमुख व बल्लारपूर विधानसभा क्षेत्र,कमलेश शुक्ला, डॉ.सागर माकडे उपजिल्हाप्रमुख ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र,उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी वरोरा विधानसभा क्षेत्र कल्पनाताई भुसारी, आजच्या आढावा बैठकीचे व्यवस्थापक तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, ब्रह्मपुरी तालुका प्रमुख नरेंद्र भाऊ नरड, जिवती तालुका प्रमुख भारत बिरादर, कोरपना तालुका प्रमुख राकेश भाऊ राठोड, राजुरा तालुका प्रमुख सचिन गोरे, भद्रावती तालुका प्रमुख कमलकांत कळस्कर, वरोरा तालुका प्रमुख श्रीकांत खंगार, पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,उपतालुका प्रमुख चंद्रपूर अविनाश उईके, बंडू पहानपाटे, उपतालुका प्रमुख भद्रावती सुंदरसिंग बावरे,राजुरा शहर प्रमुख खुशाल सूर्यवंशी,महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योती लांडगे,तृप्ती ताई हिरादेवे शहर प्रमुख भद्रावती,सौ करुणा मोघे, चेतन घोरपडे, श्री मनोज बुच्चे उपशहरप्रमुख भद्रावती, श्री पप्पू सरवण नगरसेवक भद्रावती, राजू सारंगधर नगरसेवक भद्रावती,राजू रायपुरे, गजानन सवळे, निखिल भोयर, दिनेश राठोड वैद्यकिय तालुका प्रमुख कोरपना, प्रकाश डाहूले उपतालुका प्रमुख कोरपना, अर्जुन ठाकूर युवासेना तालूका प्रमुख कोरपना, दिपक टेंभूर्णे शहर प्रमुख कोरपना व आजी माजी पदाधिकारी,  शिवसैनिक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top