अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना वनभूमी कसण्यास व वहिवाटीला बाधा निर्माण करणाऱ्या वन विभागाच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा!

Mahawani


शिवसेना जिल्हा प्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या नेतृत्वात चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे मागणी 



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२५ ऑगस्ट २३

चंद्रपुर:- येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) सुधारणा नियम, 2012 मधील नियम 15 अन्वये अपील केलेल्या अर्जावर जिल्हास्तरीय समितीमार्फत जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत वन विभागाने दावेदारच्या भोगवट्यातील वनभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही न करण्याचे क्रमांक/मह.सहा./वहका-पेसा-राखीव वन/कावि/2023/270 दिनांक 12/05/2023 च्या आपल्या पत्राला वन विभागाकडून केराची टोपली दाखवून पोलिस प्रशासनाला हाताशी घेवून चोरगांव व वरवट येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना धमकावुन/बळजबरी करुन वनभूमी कसण्यास अड़थळा आणि वहिवाटीला बाधा आणून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी व जीवन जगणे असहाय्य झाल्यामुळे आपण तात्काळ दखल घेवून दोषी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या नेतृत्वात चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे केली.

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना वनभूमी कसण्यास व वहिवाटी करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभाग यांचे शासन परिपत्रक क्र.:याचिका -2016/प्र. क्र.124/का-14/दिनांक :- 11/11/2016 नुसार आपण 1) विभागीय वन अधिकारी, चंद्रपुर वन विभाग, चंद्रपुर 2) उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर 3) उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर 4) उपवनसंरक्षक, ब्रम्हपूरी वनविभाग,ब्रम्हपूरी 5) उपसंचालक (कोअर),ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) सुधारणा नियम, 2012 मधील नियम 15 अन्वये अपील केलेल्या अर्जावर जिल्हास्तरीय समितीमार्फत जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत वन विभागाने दावेदारच्या भोगवट्यातील वनभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही न करण्याचे स्पष्ट निर्देश देवून देखील आपल्या पत्राला वन विभागाकडून केराची टोपली दाखवून पोलिस प्रशासनाला हाताशी घेवून चोरगांव येथील 995 हेक्टर व वरवट येथील 174 हेक्टर मधील शेत जमीन (सामूहिक वन हक्क) अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना धमकावुन/बळजबरी व गावातील बहुजन जनतेवर चंद्रपुर (बफर) वनपरिक्षेत्र अधिकारी एस.व्ही.महेशकर यांनी प्राथमिक अपराध क्र.09704/242586 दि.28/06/2023 अन्वये भारतीय जीव (संरक्षण) अधिनियम 1927 कलम 33 (1) अ नुसार खोटे गुन्हे दाखल करुन तसेच वनभूमीत खड्डे करुन झाडे लावून सभोवताल च्या जवळपास 40 हेक्टर परिक्षेत्रात जे. सि. बी. (पोकलैंड) ने मोठी नाली करुन अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना वनभूमी कसण्यास अड़थळा आणि वहिवाटीला बाधा आणून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी व जीवन जगणे असहाय्य झाल्यामुळे आपण तात्काळ सदर प्रकरणाची दखल घेवून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येवून येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना न्याय देण्याची जिल्हाधिकारी यांना मागणी व मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे , शिवसेना पूर्व विदर्भ,संपर्क प्रमुख, किरणभाऊ पांडव,शिवसेना जिल्हा प्रमुख,नितिनभाऊ मत्ते यांना पुढील कार्यवाही करीता पत्र देण्यात आले.

To Top