मनसेची वनपरीक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी मनविसे ता, अध्यक्ष आशिष नैताम
२९ ऑगस्ट २३
पोंभूर्णा: शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा विकास पाहता महाराष्ट्रातील अनेक पर्यटक येथे येत असतात परंतु हे इकोपार्क अल्पावधीतच क्षतिग्रस्त झालेला आहे त्यामूळे पर्यटकांनी पोंभूर्णाच्या या ईकोपार्ककळे पाठ फिरवली आहे कारण करोडो रुपये खर्च करून पर्यटकांना भुरळ घालणारा ईकोपार्क आता पाहण्या सारखा राहीला नाही अनेक जाती प्रजातीचे झाडे मृत झालेले आहेत दैनिक देखभाल नसल्याने जंगली गवताने जागा व्यापली आहे ईको पार्कमध्ये लावण्यात आलेल्या पुतळ्याचे रंग उडाले असून ते तुटून पडले आहेत या ईकोपार्कचा हिरवेगारपणा पूर्णतः नाहिसा झालेला आहे त्यामुळे शासणाणे ईकोपार्कवर केलेला करोडोचा खर्च मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा या सर्व बाबींचा विचार करून अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकरात लवकर नूतनीकरण करावे यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.मनदीप रोडे, मनसे तथा मनविसे जिल्हाअध्यक्ष श्री.राहूल बालमवार मनविसे जिल्हाउपाध्यक्ष श्री.कुलदीप चंदणखेडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार मनसेचे पोंभूर्णा तालुकाअध्यक्ष आकाश तिरुपतीवार मनविसे तालुकाअध्यक्ष आशिष नैताम यांच्या उपस्थीतीत वनपरीक्षेत्र अधिकारी पोंभूर्णा यांना निवेदन देण्यात आले यावर वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी लवकरात लवकर सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे तालुका उपाध्यक्ष रोशन भडके,मनसेचे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखील कन्नाके,मनसेचे पोंभूर्णा तालुका सचिव अमोल ढोले,मनविसे पोंभूर्णा शहराध्यक्ष पवण बंकावार, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनविसे तालुका सचिव महेश राजू नैताम, सिधु लेकलवार, महेश नैताम, विवेक विरूटकर,शन्मुख देऊरमल्ले, अश्वीन भडके, गुरुदेव बुरांडे पदाधिकारी तथा मनसैनीक उपस्थीत होते