२८ सप्टेंबर २३
सांगली: अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाची प्रथा प्रचलीत आहे. परंतु काही ठीकानी अनंत चतुर्दशी या दीवसाची अतिरिक्त गर्दी कमी करन्या करीता एक दीवसा आधी मिरवणुका काढल्या जातात. काल दिनांक. 27 सप्टेंबरला सांगली आणी पुण्याच्या काही गावामध्ये DJ च्या तालावर नाचत-गाजत मोठ्या उत्साहात गणेश उत्सवाच्या मिरवणुका निघाल्या होत्या पन मिरवणुकीचा तो उत्साह काल दोन जनांच्या जीवावर बेतला D. J च्या कर्ण-कर्कश आवाजा मुळे त्यांना मृत्युला सामोर जावे लागले आणी संबधित गावात दुःखाचे वातावर पसरले. प्रशासनाने D. J च्या आवाजा बाबत काही निर्बंध घालुल दिलेले आहे पन D.J चा आवाज कमी वायला तयार नाही आहे.
सविस्तर वृत्त: गणपती विसर्जन मिरवणुकीत D. J च्या तीव्र आवाजाने दोन तरुनाचा मृत्यु झाल्याची घटना काल सांगलीत दोन ठीकानी एकाच वेळी घडली त्या पैकी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवटे एकद आणि दुसरी वाळवा तालुक्यात दुधारी येथे घडली आहे.
दुर्घटनेत शेखर पावशे (३२) आणी प्रवीण शिरतोडे (३५) यानी आपला जीव गमवावा लागला D.J च्या तीव्र आवाजा मुळे त्याना हृदय विकाराचा धक्का बसला आणी त्यात त्यांचा मृत्यु झाला असे बोलले जात आहे.
त्या पैकी प्रवीण शीरतोडे याचा सेंट्रिंग चा व्यवसाय होता तो कामावरून घरी परत येताना त्याची दुचाकी अकस्मात बंद पडली त्या मुळे त्याला त्याची दुचाकी तसीच ढकलत घरापर्यंत आनावी लागली घरी पोहचताच परीसरात सुरू असलेल्या गनपती विसर्जनाच्या मीरवनुकीत तो सहभागी झाला काही वेळ त्याने मित्रांसोबत नाचून मिरवणुकीचा आस्वाद घेतला पन काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो तिथेच चक्कर येऊन खाली पडला दरम्यान उपचारा साठी त्याला तातळीने वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा आधीच वैधकीय अधीकाऱ्यानी त्याला मृत घोशीत केले.
दुसरी घटना तासगाव तालुक्यातील कवटी एकद येथे शेखर पावशे त्याच्याच परीसरात नीघालेली गनपती विसर्जन मिरवणूक बघन्या करीता गेला होता मात्र मिरवणुकी मधल्या D.J च्या तीव्र आवाज सहन न झाल्या मुळ हृदय विकाराने त्याचा देखील मृत्यु झाला. मिरवणुकीत ह्या दोन्ही मृत्युने सांगली शहर परीसरातून हळ-हळ व्यक्त केली जात आहे.
( Two dead after DJ's disobeying noise restrictions ) ( Mahawani ) ( Both of them died due to the sharp sound of DJ! ) ( Maharashtra Police ) ( Anant Chaturdashi Ganapati Visarjan ) ( Shekhar Pavshe ) ( Praveen Shirtode )