ग्रामसभेत ग्रामस्थाकडून सर्वानुमते ठराव पारित ग्राम पंचायतीची वार्षिक उलाढाल करोडोच्या घरात!
०३ सप्टेंबर २३
चंद्रपुर :- उर्जानगर ग्राम पंचायत ही महाराष्ट्रातील ग्राम पंचायतीमध्ये उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर असून या ग्राम पंचायतीची वार्षिक उलाढाल करोडोच्या घरात असल्यामुळे सरपंच व सचिव काही सदस्याना हाताशी घेवून जास्तीत जास्त निधी खर्च करुन आपले आर्थिक स्वार्थ कसे साधता येईल ? या हेतूने अव्याढव्य खर्च केल्याची बाब ग्रामसभेतील ग्रामस्थाच्या निदर्शनात आल्याने ग्राम पंचायतच्या खर्चाची चौकशी गांव समिती गठीत करुन करण्यात यावी, ही मागणी ग्रामसभेत लावून धरण्यात आली असता सरपंच येरगुडे व सचिव खोब्रागडे Sarpanch Yergude and Gramsevak Khobragade यांनी याबाबत विरोध दर्शवला.
परंतु गावकरी नागरिक हे देखील समिती स्थापन करण्याची मागणी मान्य केल्याशिवाय ग्रामसभेत पुढील विषय घेण्यास मनाई केल्यामुळे व उपमुख्य कार्यपालन अधिकारी, कलोडे Kalonde यांना फोन करुन सरपंच यांच्याशी प्रत्यक्ष याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याने सचिव खोब्रागडे यांनी ग्रामसभेत सर्वानुमते उर्जानगर ग्राम पंचायतच्या Urjanagar Gram Panchayat खर्चाची चौकशी गांव समिती गठीत करुन करण्यात येईल असा ठराव पारित केला.
त्यामुळे ग्राम पंचायत सरपंच, सचिव व काही सदस्याचे धाबे दणाणले असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
(Inquiry into the extravagant expenditure of Urjanagar Gram Panchayat) ( Santosh Parkhi) (Mahawani)