महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने चे जिल्हा उपाध्यक्ष शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी
०१ सप्टेंबर २३
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बोर्डा (Borda) गावांतील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतून संगणक लप्पास व ( School nutrition ) शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम ( Principal Goutam Gedam ) यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून लप्पास केलेली वस्तू व भुर्दंड वसूल करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ( Manse Vidhyarthi Sena ) जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे ( Kuldip Chandanghede ) यांच्या नेत्रुत्वात गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान गटशिक्षणाधिकारी ( Group Education Officer ) मार्फत तीन नोटीस बजाऊन देखील सेवानिवृत्त गेडाम यांनी लप्पास केलेले संगणक जमा केले नसल्याने सेवानिवृत्ती वेतनातून संगणकाची रक्कम व भुर्दंड कपात करण्याचा निर्णय घेण्यातयावा अशी मागणी मणसे विधार्थी सेने मार्फत करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा ( Zilla Parishad Primary School, Borda ) येथील सेवानिवृत्त गेडाम यांनी दिनांक 16/06/2022 ला शाळेचा प्रभार देण्यासंदर्भात मारोतराव रायपुरे केंद्र प्रमुख, वरोरा यांनी शाळेला भेट दिली असता रजिस्टर क्र. 33, पान क्र. 75 वरील नोंदीनुसार दिनांक 26/01/2020 ला गट ग्रामपंचायत, बोर्डा ने शाळेला यच. पि ( H.P ) कंपनीचे संगणक दिलेले आहे. या संगणकाची नोंद माल पुस्तकात घेतली आहे, परंतु मून मॅडम ( Madam Moon ) यांच्याकडे प्रभार सोपवतांना शालेय संपत्तीच्या यादीत संगणकाची नोंद सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी केली नाही व संगणक सुपूर्दही केलेले नाही. तसेच शालेय पोषण आहार योजनेचे कॅश बुक रजिस्टर शाळेत उपलब्ध नाही.
दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ( Education Officer, Chandrapur ) यांच्याकडे चौकशी अहवाल गटशिक्षणाधिकारी यानी पाठविला आहे परंतु या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने शाळेचे संगणक लप्पास करणाऱ्या मुख्याध्यापकाला जिल्हा परिषद पाठीशी घालत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चक्क मुख्याध्यापकांनी शाळेचे संगणक शाळेतून चोरून न्यावे ही बाब अत्यंत गंभीर असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे. करिता सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी संगणक व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर त्वरीत फौजदारी कारवाई करावी व त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून संगणकाची किमंत वसूल करावी व त्यातून शाळेला संगणक देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे. मनसे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे. मनसे वरोरा तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी. मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, देवा येरणे, प्रतीक मुडे, सूरज मानकर, संतोष नागपूरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष मयूर खंगार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बबलू परचाके इत्यादींची उपस्थिती होती. ( MNS style ) ( Mahawani )