आम आदमी पक्षाची राजुरा विधानसभा क्षेत्र कार्यकारिणी गठीत

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
१6 सप्टेंबर २३

    राजुरा: आम आदमी पक्षाची  राजुरा विधानसभा क्षेत्र कार्यकारिणी गठन व  जनशक्ती अभियान बाबत  श्री सुरज ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष व चंद्रपूर  व श्री मयूर रायकवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर  मार्गदर्शनात बैठक पार पडली.

  नुकतेच आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता प्राप्त झाली आहे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये देखील संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षाचे अध्यक्ष श्री.अरविंद केजरीवाल यांच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये जनशक्ती अभियाना ची सुरुवात करण्यात आली आहे.

    आम आदमी पक्षाचे ॲप डाऊनलोड करून  त्याद्वारे  लाखो सदस्य जोडण्याचा संकल्प आम आदमी पक्षाने घेतला आहे.

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणावर नाराज असलेल्या जनतेशी संपर्क करून आम आदमी पार्टीमध्ये सहभागी होण्याची विनंती या अभियानांतर्गत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  हे जनतेला करतील असे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष श्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.

 प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान १५००० सक्रिय सदस्य संपूर्ण जिल्यात जोडण्याची मनशा आम आदमी पक्षाची आहे.

 बोले तैसा चाले  अशी प्रतिमा असलेला एकमेव पक्ष म्हणजे आम आदमी पक्षच सध्या उरला असून अवघ्या दहा वर्षांमध्ये सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पक्ष बनला आहे व केलेल्या कामावर मतदान मागणारा एकमेव पक्ष आहे असे यावेळी बैठकीत सुरज ठाकरे यांनी सांगितले.

समाजातील विविध क्षेत्रातील लोकांची भेट या अभियानाअंतर्गत घेणे सुरु असून सर्वच स्तरावरून पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील सुरज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
तसेच अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सदस्य संख्या ही लाखाच्या घरात जाईल अशा विश्वास देखील जिल्हाध्यक्ष मयूर रायकवाड व सुरज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाशी सामान्य जनतेने जुळावे असे आवाहन देखील यावेळी श्री सुरज ठाकरे यांच्या द्वारे करण्यात आले आहे. यावेळी श्री विजय चन्ने, श्री सुनील राठोड, श्री मोहम्मद खान, श्री आशिष कुचनकर, श्री सुधाकर काळे, श्री अभिजीत बोरकुटे, श्री. जगदीश साठवणे, श्री. निखिल बजाइत, श्री. निखिल पिदूरकर, श्री. आशिष आगरकर. इत्यादी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व सदस्य घन उपस्थित होते. ( Rajura Assembly Constituency Executive of Aam Aadmi Party formed ) (Mahawani )
To Top