पशुसंवर्धन विभाग चंद्रपूर प. राजुरा अंतर्गत शेळी मेंढी वाटप #chandrapur

Mahawani



महावाणी - विरेंद्र  पुणेकर 
२२ ऑक्टोबर  २३

         चंद्रपूर: सन २०२२-२३ जिल्हा वार्षिक योजना व नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर" महाराष्ष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, रामटेक मार्फत (१०+१) १० शेळी व १ बोकाळ गटाचे वाटप जुनोना, चंद्रपूर येथील महामंळाच्या शेळी-मेंढी बाजार येथे करण्यात आले.

        सदर योजना सर्वत्र चंद्रपूर जिल्ह्यात मां. डॉ. काळे साहेब- जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त ( Dr. Kale Saheb- District Animal Husbandry Deputy Commissioner ), डॉ. उमेश हिरुटकर- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर ( Dr. Umesh Hirutkar- District Animal Husbandry Officer Zilla Parishad, Chandrapur ) यांच्या मार्गदर्शना खाली राबविणायत येत असून शासनाने दिलेल्या नियम व अटी शर्तीचे पालन करून शेळी-मेंढी गटाचे वाटप करण्यात येत आहे.  नुकतेच झालेल्या १९ ऑक्टोबर जुनोना येथे झालेल्या शेळी-मेंढी गटाचे वाटप करतांना श्री. विनोद धनकर- पुरवठादार, डॉ. कुलकर्णी- पशु संवर्धन अधिकारी शेळी - मेंढी विकास प्रक्षेत्र, बोदरी आणि डॉ. मारुती डी, हरिणखेडे- पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंच्यायत समिती, राजुरा  ( Dr. Maruti D, Harinkhede- Livestock Development Officer (Extension) Panchayat Committee, Rajura ) उपस्थित होते.

    दिवाळी आधी लाभार्त्याना लाभ मिळाल्याने लाभार्त्यात खुशीचे वातावरण दिसून येत असून लाभार्थ्याकडून शासन व पशुसंवर्धन विभागाचे आभार मानल्या जात आहे.

"Punyashlok Ahilya Devi Hodkar" Maharashtra Goat and Sheep Development Corporation under the District Annual Plan and Innovation Scheme for the year 2022-23 ) ( Chandrapur ) ( Junona ) ( rajura ) ( Mahawani )

To Top