१२ ऑक्टोबर २३
राजुरा: हळूहळू 2024 च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत व सर्वेच पक्ष आपापल्या परीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चाचपणी करून कामाला लागले आहेत काही जुने उमेदवार आहेत तर काही नवख्यांनी देखील दंड थोपटले आहे.
महाराष्ट्रातील एकंदर राजकीय स्थिती 2019 पासून अस्थिर असल्यामुळे या अस्थिरतेचा फायदा आपापल्या परीने आपल्या पक्षाला कसा मिळेल याकरता सर्व पक्ष गणिते लावत आहेत.
येणार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाने देखील मेरी माटी मेरा देश घर चलो अभियान अशा पद्धतीच्या अभियानाच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालविला आहे.
यामध्येच आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रात आम आदमी पक्षाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला असून सुरज ठाकरे यांनी नुकताच आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला व झाडू यात्रेच्या माध्यमातून जनसंवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व विदर्भामध्ये 2 ऑक्टोंबर पासून सेवाग्राम वर्धा येथून झाडू यात्रेचा आरंभ पक्षाद्वारे करण्यात आला. या झाडू यात्रेचा शेवटचा टप्पा हा राजुरा विधानसभा क्षेत्र होता यामध्ये कोरपणा गडचांदूर व राजुरा या भागामध्ये सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात झाडू यात्रा करण्यात आली व त्याचा शेवट राजुरा येथील गांधी चौकामध्ये जाहीर सभेमध्ये द्वारे करण्यात आला.
या सभेमध्ये आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.धनंजय शिंदे, श्री. संदीप देसाई प्रदेश संघटन सचिव श्री.भूषण डाकुलकर प्रदेश संघटन सचिव श्री.मयूर दोंडकार प्रदेश युवा अध्यक्ष श्री.सुनील मुसळे वरिष्ठ नेते,श्री.मयूर राईकवार जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर,श्री.संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, श्री.योगेश गोखरे महानगर अध्यक्ष, श्री.संतोष बोपचे महानगर युवा अध्यक्ष,श्री.योगेश मुऱ्हेकर चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, श्री. सुनील भोयर. तसेच खेड्यापाड्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते व सुरज ठाकरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेमध्येच पक्षातून आलेल्या पक्षश्रेष्ठींकडून सुरज ठाकरे यांच्या नावाची घोषणा आम आदमी पक्षाच्या राजुरा विधानसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून करण्यात आली आहे.
अवघ्या दहा ते बारा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेस व बीजेपी सारख्या बलाढ्य पक्षांना राजकारणात व निवडणुकीच्या मैदानात चित करून दिल्ली व त्यानंतर पाठोपाठ पंजाबची एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांना यश प्राप्त झाले आहे अरविंद केजरीवाल यांचा झाडू आता महाराष्ट्रामध्ये चालणार का हा येणारा काळाच ठरवेल राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये मात्र युवा नेतृत्व आम आदमी पक्षाला लागल्याने सुगीचे दिवस या माध्यमातून आम आदमी पक्षाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नक्कीच प्राप्त होतील.
सुरज ठाकरे यांची प्रतिमा एक आंदोलन कारी म्हणून प्रचलित आहे
सोशल मीडियावर आपल्या फेसबुकच्या माध्यमातून सडकून टीका करण्यामध्ये सुरज ठाकरे यांनी ख्याती प्राप्त केली आहे. सध्या युवा वर्ग त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये उभा असल्याचे चित्र या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे.
विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमधून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याचे चित्र राजुरा शहरांमध्ये बघायला मिळाले मै भी किसी से कम नही म्हणत सूरज ठाकरे ने देखील विधानसभा निवडणुकीचा बिगुल या सभेच्या माध्यमातून फुंकला आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रामधील खराब रस्ते, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची होणारी गैरसोय, शासकीय शाळा बंद करण्याचा विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय, कंत्राटी पद्धतीने शासकीय पदे भरण्याचा घेतलेला निर्णय, राजुरा शहरांमध्ये वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांना आळा बसवण्यास असमर्थ्य ठरलेले प्रशासन इत्यादी मुद्द्यांवर हात घालत ही सभा विविध वक्त्यांच्या माध्यमातून पार पडली.
भविष्यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये चौरंगी लढत नक्कीच बघायला मिळेल यात काही शंका नाही. आता मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे तर निवडणुकीनंतरच सांगता येईल.
( mahawani ) ( suraj Thakre ) ( app zadu yatra ) ( Rajura )