शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर प्रवेशासाठी २६४ पैकी १३२ जागांसाठी परवानगी १३२ जागा वंचितच.

Mahawani

 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२० ऑक्टोबर २३

        चंद्रपूर: सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षाकरिता केन्द्रीय आयुष प्रवेश परामर्श समितिद्वारा दिनांक १० ऑक्टोबर २०२३ प्रकाशित सीट मॅट्रिक्स नुसार महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, उस्मानाबाद, नांदेड या ०४ शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर प्रवेशासाठी एकूण १३२ जागांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. 

        सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने महाराष्ट्रातील चारही शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर प्रवेशासाठी २६४ जागांना मंजुरी दिलेली होती. परंतु प्राध्यापकांच्या रिक्त जागा, कर्मचारी यांचा अभाव, पशुगृहे उपलब्ध नसणे इत्यादी कारणास्तव भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने १६० जागांना परवानगी दिलेली होती. परंतु केंद्रीय आयुष प्रवेश परामर्ष समिती द्वारा २३ जानेवारी २०२३ या तारखेला प्रकाशित सीट मॅट्रिक्सनुसार महाराष्ट्रामध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागा बघता २६४ पैकी फक्त ११८ जागांना प्रवेशासाठी परवानगी देण्यात आलेली होती. एकूण १४६ जागांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे पदव्युत्तर प्रवेशासाठी महाराष्ट्रातील १४६ विद्यार्थी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित राहिले व तसेच  डॉ. परिक्षित वांढरे ( dr. parishit wandhre ) अध्यक्ष (निमा स्टूडेंट फोरम चंद्रपुर ) ( Nima Student Forum Chandrapur ) यांचा माहिती प्रमाणे यावर्षी सुद्धा केंद्रीय आयुष प्रवेश परावर्ष  समिती द्वारा १० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित सीट मॅट्रिक्स द्वारा महाराष्ट्रातील चारही शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये फक्त १३२ जागांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे याचा अर्थ या शैक्षणिक वर्षांमध्ये सुद्धा १३२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहावे लागेल.

        यावर्षी सम्पूर्ण भारतातून AIAPGET द्वारे पदव्युत्तर प्रवेशासाठी २५,६२७ आयुर्वेद स्नातकांनी परीक्षा दिलेली आहे व यामध्ये महाराष्ट्रातील अंदाजे सुमारे ५,००० ते ६,००० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. तरी सदर विषयास गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र राज्यातील चारही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यामध्ये १३२ जागेच्या पदव्युत्तर प्रवेशवाढी संदर्भात संबंधित अधिकारी यांची तत्काळ बैठक घेऊन न्याय द्यावा व विद्यार्थ्यांवरील सतत दरवर्षी होणारा अन्याय दूर करावा असी मांग विद्यार्थ्यातून होत आहे. ( This year, 25,627 Ayurveda graduates from all over India have appeared for post graduate admission through AIAPGET ) ( mahawani ) ( chandrapur ) ( AIAPGET )

To Top