बाई झाली सरपंच वाया गेला ग्रामपंचायतिचा प्रपंच

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
१४ ऑक्टोबर २३

            चिमूर: तालुक्यातील शंकरपूर अंतर्गत ग्राम पंचायत वाकर्ला गावातील येथील ग्रामसेविका वैशाली गेडाम यांनी 3 ऑक्टोबर 2023 ला आर. टी. जी. एस ( RTGS ) व धनादेशावर माझी खोटी स्वाक्षरी करुन स्नेहल किसान नर्सरी नॅशनल हायवे नं. 7, हिंगणघाट ( Snehal Kisan Nursery National Highway No. 7, Hinganghat Transferred one lakh rupees या नावाने एक लक्ष रुपये ट्रान्सपर केले. ग्रामपंचायत वाकर्लाच्या पैशांची अफरातफर केली आहे. वाकर्ला संरपचानी दिनांक १२ गुरुवारला बातमी प्रकाशित केली आहे कि धनादेशावर ग्रामसेवीका वैशाली गेडाम यांनी सरपंच लक्ष्मी अमोल तुमराम यांची खोटी स्वाक्षरी करुन एक लक्ष रुपये ट्रान्सपर केले, ग्रामपंचायतीच्या पैशांची अफरातफर केली आहे. अशा खोट्या बातम्या प्रकाशीत केल्या आहे. 

        संरपच ज्याघरात राहते त्यांच्या सासऱ्याचे आहे  २०१६ -१७ मध्ये घरकुल योजनेचे आहे मे महिन्यात पंचायत समितीत अमोल तुमराम यांनी खोटे कागदपत्रे जोडून कसे तरी घरकुल मंजूर करून घेतले यांच घरकुल फाईलवर वैशाली गेडाम यांनी स्वाक्षरी केली नाही म्हणूनच अनेक वेळा विरोधात तक्रारी ,खोटया बातम्या प्रकाशीत केल्या आहे आर.टि.जी. एस. वर स्वतः सरपंचांनी स्वाक्षरी केली व  खोटी स्वाक्षरी करून पैशाची हेराफेरी केली असे कोणतेही अफरातफर घडली नसुन चेक वर सरपंचाच्या स्वाक्षऱ्या आहे या खोट्या बातम्या प्रकाशित करून मला बदनाम केले जात आहे. 

        सदर प्रकरनात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून  संरपंचावर  फौजदारी गुन्हा व निलंबनाची प्रक्रिया करावी अशी मागणी ग्रामसेवीका वैशाली गेडाम ( vaishali gedam ) यांनी प्रतिनिधीना दिली आहे.

       वाकर्ला ( vakarla ) गावात ग्राम पंचायतीच्या कामात सरपंचाचे पतीदेव अमोल तुमराम ( amol tukaram ) सर्रासपणे लूडबूड करताना दिसतात अनेक शासकीय कामात ढवळाढवळ करत असतात ग्रामपंचायत कार्यालयात शिवाय संबंधित पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना बसताही येत नाही असे प्रकार वाकर्ला ग्राम पंचायत मध्ये चित्र बघायला मिळत आहे. ( mahawani ) ( chimur ) ( grampanchyayat )( Sarpanch )

To Top