बल्लारपूर सेवाग्राम लिंक एक्सप्रेस नवीन वर्षा आधी सुरु करा.

Mahawani

 

सामाजिक कार्यकर्ते रोहन कळसकर यांची ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे निवेदनात्मक मागणी. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
३० नोव्हेंबर २३

        बल्लारपूर  : बल्लारपूर , व्हाया, वर्धा, मुंबई, चंद्रपुर, जिल्हातुन मुंबई ला जानारी एकमेव रेल्वे बल्लारशाह सेवाग्राम लिंक एक्सप्रेस दोन वर्षा पासुन बंद आहे. चंद्रपुर व गडचिरोली जिल्हातील हजारो प्रवाश्यांना वर्धा, अमरावती, अकोला, शेगांव, शिर्डी, नाशिक, त्रिंबकेश्वर, मुंबई ला जाण्याकरीता सोईची होती ती अध्याप बंद आहे. 

        त्यामुळे प्रवास्यांना नागपुर रेल्वे स्थानक गाठत संबंधीत रेल्वे घ्यावी लागत आहे. ज्यात प्रवास्यांना वेळ व अतिरिक्त भांडवल मोजावे लागत आहे. तसेच मोठ्या संख्येने प्रवास्यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे.  सदर बाब लक्षात घेत बल्लारपूर शहरातील झासी राणी सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष मा.  रोहन कळसकर यांनी पालकमंत्री मा.  ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत सदर प्रश्नावर तातडीने योग्य कार्यवाही करत संबंधीत विभागाशी संवाद साधून सदर रेल्वे परत नूतन वर्षाच्या अगोदर पुनर्वत करण्यात यावी अशी विनंती केली आहे. ( President of Jhasi Rani Cultural Board Hon. Rohan Kalskar ) ( mahawani ) ( ballarpur )( sudhir mungantiwar )

To Top