कावेरी कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याच्या शासन निर्णयाला पायदळी तुडवून परप्रांतीय कामगारांना प्राधान्य..!
कंपनी प्रशासनावर तात्काळ कार्यवाही करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या : शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मागणी
२१ डिसेंबर २३
चंद्रपुर : येथील भटाळी वेकोलीतील कावेरी कंपनीमध्ये 80 टक्के स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याचा शासन निर्णय असतांना देखील शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगारांना प्राधान्य दिल्यामुळे या संदर्भातील संपूर्ण माहिती घेवून कंपनीच्या संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करुन स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी चंद्रपुरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना तक्रारीद्वारे करण्यात आली.
चंद्रपुर जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असून कोळशाचे उत्खनन व ओवरबर्डन माती उचलण्याचे काम खाजगी कंपन्यांना ठेका पद्धतीने देण्यात आले असून भटाळी वेकोलीतील ठेका कावेरी कंपनीला देण्यात आला. खाजगी कंपनीमध्ये 80 टक्के स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याचा निर्णय असताना सुद्धा भटाळी वेकोलीतील कावेरी कंपनीमध्ये शासन निर्णयाला पायदळी तुडवून स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगारांना प्राधान्य दिल्यामुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये असंतोष व चिड निर्माण होत असून याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच सदर कंपनीकड़े किती कामगार स्थानिक व किती परप्रांतीय याची माहिती घेवून त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे का? ज्या परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन झालेले नसेल त्यापैकी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे सुद्धा असू शकतात आणि त्यांच्यापासून CTPS व स्थानिकांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जिल्हा व पोलिस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेवून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
जेव्हा की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी गौडा यांनी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ कंपनीच्या संबंधितांवर कार्यवाही करुन स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
अन्यथा नाईलाजास्तव शिवसेना पद्धतीने सदर विषय हाताळावा लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे तक्रारीद्वारे करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उद्योगमंत्री उदयजी सामंत, शिवसेना पूर्व विदर्भ संघटक, किरणभाऊ पांडव, संपर्क प्रमुख दत्तात्रयजी पईतवार, संपर्क प्रमुख गंगाधरजी बडुरे, चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिनभाऊ मत्ते व चंद्रपुर पोलिस अधिक्षक परदेशी यांना सदर तक्रारीचे निवेदन देण्यात आले. ( chandrapur ) ( mahawani ) ( santosh parkhi ) ( shivsena )