१५ डिसेंबर २३
चंद्रपूर : शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. एकनाथभाई शिंदे साहेब यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरणभाऊ पांडव यांचे सूचनेनुसार चंद्रपुर संपर्कप्रमुख दत्तात्रयजी पईतवार व संपर्कप्रमुख गंगाधरजी बडूरे चंद्रपूर जिल्हा यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक श्री किरणजी लांडगे साहेब यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा निमित्त दि. 13 डीसेंबर ला चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर या तीन्ही विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पार पडली.
या बैठकीमध्ये चंद्रपुर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांनी येत्या दोन दिवसात प्रत्येक पदाधिकाऱ्याने शाखाप्रमुख, बुथ प्रतिनिधी व शिवदूत यांची नेमणूक करणे अनिवार्य असून एका बूथावर एक बूथ प्रमुख व 10 शिवधूत नेमून शिवसेना मजबुती करण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा जे पदाधिकारी शिवदूत व बूथ प्रतिनिधी यांची नेमणूक करणार नाहीत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी दिले. यावेळी बोलताना चंद्रपूर लोकसभा क्षेत्र निरीक्षक किरणजी लांडगे यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाप्रमुखांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे व लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेना पक्षाची काय स्थिती आहे? शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे काय ? पदाधिकाऱ्यांनी शाखाप्रमुख व बूथ प्रमुख, शिवदूत यांच्या नेमणुका केल्या आहेत काय?याची इत्यंभूत माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांनी कुठलाही किंतु परंतु न करता पदाचा सदुपयोग करून शिवदूत व बूथ प्रतिनिधीची तात्काळ नेमणूक करावी.जर सदर नेमणुका करताना कुठलाही पदाधिकाऱ्यांनी हयगय केली, तर त्या पदाधिकाऱ्यांनी सरळ आपला पदत्याग करून मोकळे व्हावे असे स्पष्ट निर्देश दिले.
आगामी निवडणुकांना सामोरे जाताना बेसिक गोष्टी या आपल्याजवळ असणे आवश्यक असून पदाधिकारी यांनी प्रत्येक बारीक-सारीक विषयाकडे लक्ष देऊन त्या करून घ्यावे, असे न आढळल्यास जो पदाधिकारी दोषी असेल त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल व येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला कशा पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडून देता येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची आहे असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावागावात शहरातील वार्डा वार्डात शिवसेनेचे फलक हे त्या त्या पदाधिकाऱ्यांनी लावलेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश किरणजी लांडगे साहेब यांनी दिले. सदर बैठकीचे संचालन चंद्रपूर तालूका प्रमुख श्री संतोष पारखी यांनी तर प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हाप्रसिद्धी प्रमुख (चंद्रपुर, वरोरा व बल्लारपूर विधानसभा) आशिष ठेंगणे यांनी केले.
श्री भरत गुप्ता महानगर प्रमुख चंद्रपूर, सूर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, सौ . योगिताताई लांडगे जिल्हा संघटिका महीला आघाडी चंद्रपूर, सौ मिनलताई आत्राम जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर, प्रतिमाताई ठाकूर जिल्हाप्रमुख महीला आघाडी चंद्रपूर या सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित श्री श्रीकांत खंगार तालुका प्रमुख वरोरा, श्री राजेश डांगे शहरप्रमुख वरोरा, श्री चांदेकर जी विधानसभा प्रमुख बल्लारपूर, श्री पंकज वडेट्टीवार तालूका प्रमुख पोंभूर्णा, श्री जमिल शेख तालूका प्रमुख बल्लारपूर, श्री श्रेयस ठाकूर शहर प्रमुख बल्लारपूर, पप्पू सरवण शहर प्रमुख भद्रावती, श्री राजू सारंगधर नगरसेवक भद्रावती, संजयकुमार शिंदे, तालुका संगठक चंद्रपुर, श्री अविनाश उके उपतालुका प्रमुख चंद्रपूर, गुरुदास मेश्राम उपतालुका प्रमुख चंद्रपूर,उप-महानगर प्रमुख तरुण येनगंटीवार, विश्वास खैरे, सूचक दखने वाणी सादलवार व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. Shri Bharat Gupta Metropolitan Chief Chandrapur, Surya Adbale Yuva Sena District Chief Chandrapur, Mrs. Yogitatai Landge District Association Mahila Aghadi Chandrapur, Mrs. Minaltai Atram District Chief Mahila Aghadi Chandrapur, Pratimatai Thakur District Chief Mahila Aghadi Chandrapur were also guided by Mr. Shrikant Khangar Taluka Chief Varora, Mr. Rajesh Dange City Chief Varora, Mr. Chandekar Ji Assembly Chief Ballarpur. , Mr. Pankaj Wadettiwar Taluka Head Pombhurna, Mr. Jamil Sheikh Taluka Head Ballarpur, Mr. Shreyas Thakur City Head Ballarpur, Pappu Saravan City Head Bhadravati, Mr. Raju Sarangdhar Corporator Bhadravati, Sanjay Kumar Shinde, Taluka Organizer Chandrapur, Mr. Avinash Uke Uptaluka Head Chandrapur, Gurudas Meshram Uptaluka Chief Chandrapur, Sub-Metropolitan Chief Tarun Yengantiwar, Vishwas Khaire, Indicator Dakhne Vani Sadalwar and Shiv Sena officials ( Shiv Sena Review Meeting Chandrapur Lok Sabha Inspector Hon. Strict instructions to appoint Kiranji Landge's booth representative and Shivdut! ) ( mahawani ) ( santosh parkhi ) ( chandrapur )