शहरात वृक्षांवर लागलेले अनधिकृत ब्यानर्स नगर परिषदेने तात्काळ हटवले.

Mahawani

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या निवेदनाची मुख्याधिकारी यांनी घेतली तात्काळ दखल. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
23 डिसेंबर 23

            राजुरा : वृक्ष म्हणजे घेतो तो स्वास आणि खातो तो घास याच वृक्षवर खिळे ठोकून लावलेले बॅनरस बाबत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे देण्यात आलेल्या निवेदनाची मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव ( Dr. Suraj Jadhav ) यांच्या कडून सदर निवेदनाची तात्काळ दखल घेत राजुरा शहरातील वृक्षावर अनधिकृतपणे लागलेले ब्यानर्स ( Banners) तात्काळ काळण्यात आले. राजुरा शहराला ग्रीन कव्हर ठरवणारे हे वृक्ष असेच ब्यानरमुक्त ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सतर्क राहून असे ब्यानार लावणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कार्यवाही वेळीच केल्यास अश्या चुकीच्या प्रकारावर नक्कीच रोक लागेल. तसेच राजुरा शहरातील जुने वृक्षांची गणना करून त्यांना हेरिटेज ट्री घोषित करून त्याचे संवर्धन व संरक्षण केले जाईल का याकडे राजुरावासी पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहेत. आजच्या मा. मुख्याधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाने नक्कीच या समोर वृक्षावर कुठलीही बॅनर बाजी होणार नाही. ( Conservation of natural environment and human development ) ( mahawani ) ( rajura )

To Top