हुकुमशाही सरकारला जनतेने धडा शिकवावा - आमदार सुभाष धोटे

Mahawani


आ. सुभाष धोटेंच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकला काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०६ डिसेंबर २३

        राजुरा : आज दिनांक ४ डिसेंबर रोज सोमवार ला सकाळी ठिक १२ वाजता संविधान चौक राजुरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लोकप्रिय आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालय राजुरा येथे हजारोच्या संख्येने धडक दिली. 

      यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सजनतेला संबोधित करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, मागील १० वर्षापासून हुकूमशाही सरकारने जनतेची फसवणूक करण्याचे काम केली आहे. सर्व विभागात खाजगीकरण करून अनेक शासकीय संस्था विक्रीस काढलेल्या आहेत. शेतीमालाला हमीभाव नाही. शेतकर्‍यांना पिकविम्याचे पैसे दिलेले नाही. जनतेला प्रचंड महागाईच्या खाईत लोटले. बेरोजगारांची पिळवणूक होत आहे. आरक्षणावरून समाजासमजात तेड वाढवित आहेत. त्यामुळे या आंधळ्या बहिऱ्या सरकारला आता जनतेने धडा शिकवावा. 

         यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून भारताच्या महामहिम राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पाठविण्यात आले. यात ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण न देणे, बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करणे, अतिवृष्टीमुळे शेतीचे व घराचे नुकसानीचे पंचनाम्याप्रमाणे आर्थिक मदत देणे, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक मध्ये तात्काळ करणे, आदिवासी वगैरे आदिवासींना जमिनीचे पट्टे तातडीने देणे, गॅस पेट्रोल डिझेल व वाढती महागाई यांचे दर कमी करणे, संजय गांधी निराधार योजना व वृद्धापकाळ योजनेची रक्कम लाभार्थ्यांना नियमित देणे, ओबीसी मुलांचे बहात्तर वस्तीगृह तात्काळ सुरू करणे, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करणे, विद्यार्थी हितासाठी २० पटसंख्या खालील शाळा बंद होऊ नये यासाठी समूह शाळा संकल्पना रद्द करणे, चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून राजुरा मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देणे, जून - जुलै महिन्यातील अति पावसाने पूर परिस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची थकीत नुकसान भरपाई देणे, सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम तात्काळ देणे, सोयाबीन कापूस धान या सर्व पिकासह हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करणे, जंगली जनावरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विशेष पीक विमा लागू करणे, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तातडीने देणे, कृषी पंपाचे वीज जोडणे ताबडतोब करणे, कृषी पंपांना २४ तास विद्युत पुरवठा देणे, घरगुती मीटरचे वाढीव युनिट दर रद्द करणे, वन विभागाकडून मिळणारा वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला तात्काळ देणे, जीवती तालुक्यातील महसूल जमीन पण विभागाच्या रेकॉर्ड मधून कमी करणे, जिवती तालुक्यातील नागरिकांना विविध दाखले स्थानिक स्तरावर देणे, जिवती तालुक्यातील ल.वा. तलावाची मंजूर कामे, जिवती, कोदेपूर, गुडसेला तत्काळ सुरू करणे, राजुरा विधानसभेतील पाठ बंधारे तलावचे अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे, जंगली डुकरांना मारण्याची परवानगी देणे नाही तर एकरी ५० हजार नुकसान भरपाई देणे २०१७ ते २०१९ मधील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करणे, दोन लाखाच्या वरील कर्ज माफ करणे, अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायम पट्टे देणे, शेतीकडे जाणारे पांदण रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करणे, पेसा ग्रामपंचायत मधील हिंदू पत्ता संकलन मजुरांना तात्काळ बोनस देणे, चंद्रपूर जिल्ह्याला पिक विम्याचे 95 ते 100 कोटी रुपये मिळणे अपेक्षित असतांना अधिवेशनाच्या तोंडावर 23.50 कोटी मंजुर करून अधिवेशनाच्य जिल्ह्यातील  ७७ % शेतकऱ्यांना वंचीत ठेवले आहे. या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ ती रक्कम देणे. 

       या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामीजी येरोलवार, विजयराव बावणे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे, गणपत आडे, महिला काँ. अध्यक्षा निर्मला कुळमेथे, आशाताई खासरे, नंदाताई मुसने, सोनुताई दिवसे, शहराध्यक्ष संध्याताई चांदेकर, आदिवासी नेते श्यामराव कोटनाके, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नंदकिशोर वाढई, कृ. उ. बा. स सभापती विकास देवाळकर, अशोक बावणे, यु. काँ. जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार,  माजी सभापती कुंदाताई जेणेकर, कविता उपरे, अल्पसंख्याक विभागाचे सय्यद सकावत अली, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष कोमल फुसाटे, सुनिल देशपांडे, अभिजीत धोटे, राजुरा वि. स. काँ. अध्यक्ष उमेश गोनेलवार, यु. काँ. महासचिव प्रणय लांडे, तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, प. स. सदस्य, आजी - माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कृ. उ. बा. स. चे संचालक, तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, राजुरा विधानसभा काँग्रेस, तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस, अनुसूचित जाती जमाती सेल, विमुक्त जाती जमाती सेल, किसान सेल, ओबीसी सेल, एन एस आय यु तथा काँग्रेस फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ( The Jan Awach Morcha of Congress led by Subhash Dhote hit the tehsil office ) ( rajura ) ( mahawani ) ( mla )

To Top