२१ डिसेंबर २३
बल्लारपूर : मागील काही महिन्यांपासून आम आदमी पक्षातर्फे शहरातील शालेय पोषण आहारासंदर्भातील केंद्रीय स्वयंपाकगृह व स्वंयपाकी आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत होत असलेल्या गैरप्रकारासंदर्भात विविध स्तरांवर पाठपुरावा केला जात आहे. मदतनीसांना शासननियमानुसार 2500 रूपये वेतन दिल्या जात नसल्यामुळे मागील 4-5 महिन्यांपासून मदतनीस व स्वयंपाकी महिलांनी मानधन स्विकारलेले नाही. यामुळे या महिलांची अशी स्थिती बघून आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी विशाल वाघ यांना यासंदर्भात त्वरित बैठक बोलाविण्याची मागणी केली. तसेच जिल्हयात कुठेही नसलेली परंतु फक्त बल्लारपूर शहरातच असलेल्या केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळेस शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, सचिव ज्योतिताई बाबरे, संगठनमंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, सोशल मिडिया प्रमुख सौरभ चौहान उपस्थित होते. याप्रकरणी उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी बैठक घेण्याचे आश्वासन पक्षाच्या शिष्टमंडळास मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिले. ( Aam Aadmi Party demands immediate meeting regarding central kitchen and helper salary ) ( mahawani ) ( aam admi party ) ( ballarpur )