चंद्रपुरात संपन्न झाली नियोजन बैठक.
०६ डिसेंबर २३
चंद्रपूर : चालबाज राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून शेतकरी व बेरोजगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर तसेच जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांवर नागपूर येथे प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे लबाड राज्य सरकारच्या विरोधात विविध मागण्यांबाबत दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सोमवारला दिक्षाभूमी ते माॅरिश काॅलेज टी पाईंट अशा हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्चात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसप्रेमी नागरिकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे हल्ला बोल मार्चाच्या नियोजनार्थ पार पडलेल्या बैठकीत केले.
यावर्षी खरीप हंगामात सुरूवातीला झालेली अतिवृष्टी व नंतर पावसाचा पडलेला खंड तसेच येलो मोझेंकचे आक्रमण, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, जंगली जनावरांचा हैदोस व सततची विद्युत लोडशेडींग यामुळे कापूस, सोयाबीन, धान, तूर इत्यादी पिक पुर्णतः उध्वस्त झाले आणि आता पडलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने उरल्यासुरल्या खरीप हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच रब्बी हंगामातील धान, गहू व हरबरा या पिकांसह संत्रा, द्राक्षे, आंबा, डाळींब, पपई, केळी, ऊस या पिकांचे देखिल प्रचंड नुकसान झालेले आहे. परंतू केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांसाठी दुष्काळ जाहिर केला नाही. तसेच शासन स्तरावरून कोणतीही आर्थिक मदत अथवा पिकविमा देखिल दिला नाही. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा आता उरलेली नाही. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी यांमुळे सर्वसामान्य जनतेचे देखिल जगणे कठीण झालेले आहे म्हणून या निष्ठूर सरकारविरोधात या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आ. धोटे यांनी दिली.
तर या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस चंद्रपूर जिल्हा प्रभारी मुजीब पठाण यांनीही सद्याची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाफील न राहता एकसंघ होऊन सरकार च्या अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज उठवला पाहिजे असे आवाहन केले, माजी आमदार आनंदराव गेडाम. यावेळी माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी, जेसाभाई मोटवानी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसीह रावत, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, नंदू नागरकर अरुण धोटे, शिवा राव, उमाकांत धांडे, प्रशांत दानव, सोहेल रजा, प्रशांत भारती, प्रमोद बोरीकर, युसूफभाई, प्रवीण पडवेकर यासह जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस फ्रँटल ऑर्गनाइझेशन चे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते. ( Participate in large numbers in "Hullabol" Morcha at Nagpur : Aa. Subhash Dhote's appeal to Congress office bearers ) ( mahawani ) ( Rajura MLA )