इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला निवासी ऍडवेचर कॅम्प.

Mahawani




महावाणी - विरेंद्र पुणेकर
१६ डिसेंबर २३

        राजुरा : इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या वतीने वर्ग 8, 9 व 10 (CBSE) वर्गातील विद्यार्थ्यांनी आयरा ऍडवेचर कॅम्प, चंद्रपूर येथील प्रशिक्षीक चमुच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांकडून विविध ऍडवेचर कृति करून घेतल्या. त्यामध्ये तंबू उभे करणे, नेमबाजी, राफल फायरिंग, बारमा ब्रिज, कमांडो नेट, ल्याडर ब्रिज, झिप लाईन ल्याडर क्लम्बिंग, कॅम्प फायर करून नृत्याचे सादरीकरण करणे तसेच जलतरण तलावात सहभाग घेतला. 

        या कॅम्पला विध्यार्थ्यांसोबत सहा. शिक्षक उमेश लढी, संतोष सागर, सुभाष पिंपळकर, हर्षल क्षीरसागर आणि शिक्षिका नसीम शेख, वैशाली धानोरकर, विद्या चौधरी व अश्विनी फासला यांनी सहभाग घेतला. कॅम्प यशस्वी होण्यासाठी सी. बी. एस. ई विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा अलोणे, आयरा ऍडव्हाचर कॅम्प व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. ( Umesh Ladhi, Santosh Sagar, Subhash Pimpalkar, Harshal Kshirsagar and teachers Naseem Shaikh, Vaishali Dhanorkar, Vidya Chaudhary and Ashwini Fasla ) ( rajura ) ( mahawani )

To Top