भाविकांनी प्रशासकीय नियम पाळून जोगापूर देवस्थानचे दर्शन घ्यावे -आमदार सुभाष धोटे.

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ डिसेंबर २३

        राजुरा : आजपासुन सुरू होत असलेल्या जोगापूर यात्रेकरीता भाविकांसाठी एक महिना परवानगी देणे संबंधात, तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता व यात्रे दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या करीता करण्यात येणा-या उपाययोजना बाबत श्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर, यांचे मार्गदर्शनात व आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली वननिरीक्षण कुटी राजुरा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

       वनपरिक्षेत्र अधिकारी सूरेश येलकेवाड यांनी सभेत सद्या स्थितीत राजुरा वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल व इतर वन्य प्राणी अस्तित्वात असल्याबाबतची माहिती देवून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता व भाविकांच्या संरक्षणार्थ उपाययोजना सुचविल्या. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व मान्यवर व अधिकारी, कर्मचारी यांनी चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतले. 

       यावेळी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना जोगापूर देवस्थान येथे आवश्यक सर्व सुविधा व सुरक्षा पुरविण्याचे निर्देश दिले. तसेच येथे वाघ बिबट्या व अन्य वन्यजीव प्राण्यांचा वावर लक्षात घेता भाविकांनी प्रशासकीय नियम पाळून जोगापूर देवस्थानचे दर्शन घ्यावे असे आवाहन केले. 

        यावेळी खालील निर्णय घेण्यात आले. जोगापूर मंदिरामध्ये भाविकांना दर्शनाकरीता वेळ सकाळी 8.00 ते सांयकाळी 4.00 वाजेयपर्यंतच राहिल. सायंकाळी 4.00 वाजेनंतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. तसेच सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मंदिर परिसर खाली करावा लागेल. जोगापूर मंदिर परिसरात कोणतेही दुकाने लावता येणार नाही. पुजेचे साहित्य व प्रसादाच्या साहित्याची दुकाने जोगापूर गेट च्या बाहेर लावता येईल. भाविकांना सोबत फक्त पुजा साहित्य व प्रसाद नेता येईल. तथापी सोबत कोणत्याही प्लॉस्टीक चा वापर करता येणार नाही. भाविकांना जोगापूर मंदिरात जाण्या येण्याकरीता बसस्थानकावरून बस सेवा उपलब्ध करण्यात येत असुन, 2 ते 3 बसेस सकाळी 08.00 ते सांयकाळी 4.00 वाजेपर्यंत सातत्याने फे-या मारतील. भाविकांना जोगापूर मंदिर परिसरात स्वंयपाक करण्यास बंदी राहील. सदरील जोगापूर यात्रा नियोजन संदर्भातील तसेच मानव वन्यजीव संघर्ष प्रतिबंधात्मक संरक्षणाच्या कामाकरीता लागणारा आवश्यक निधी वनविभागाचे स्तरावर करावा. नगर परिषद मार्फत जोगापूर मंदिर परिसरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून बोरवेल दुरुस्ती करणेबाबत ठरविले. वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे मंदिर परिसरा व्यक्तीरीक्त जंगलात इतरत्र क्षेत्रात प्रवशे बंदी करण्यात आलेली आहे. तथापी कोणीही इतरत्र क्षेत्रात प्रवेश बंदी ठिकाणी गेल्यास व अनुचित घटना घडल्यास नागरीक स्वतः जबाबदार राहणार. पोलीस विभागाकडून नियमित रीत्या पोलीस बंदोबस्त राहील. व दर्शनाची वेळ संपतांच जोगापूर मंदिर परिसर खाली करण्याबाबत सुचना देण्यात येईल. वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय मुल यांचे कडून जोगापूर यांत्रेकरीता भाविंकासाठी नियमितरीत्या अॅम्बूलंसह एक मेडीकल कॅम्प ठेवण्याचे ठरविण्यात आले. जोगापूर मंदिराकडे जाणा-या 8 रस्त्यावर भाविकांची नोंदी घेण्याकरीता, तसेच मंदिर परीसरात व वनामधील रस्त्यावर देखरेख व गस्ती करीता अतिरीक्त मनुष्यबळाचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. प्रशासनिक अधिकारी व कर्मचारी यांची निर्णय समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

       यानंतर पहिल्या दिवशी जोगापूर यात्रे निमित्याने जोगापूर गेट राजुरा येथे मा. श्री. सुभाषभाऊ धोटे, आमदार विधानसभा क्षेत्र राजुरा यांनी जोगापूर यात्रेचा शुभांरभ केला व जंगल परिसरातील जागृत हनुमान मंदिर देवस्थानात पुजा व आरती केली. या दरम्यान यात्रे करीता येणा-या भाविकांना संबोधून आ. सुभाष धोटे सर्वाना सुखरूप यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. 

      या प्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, प्रभारी उपविभागीय वन अधिकारी एस. आर. लंगडे, तहसिलदार ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, श्री. धमेंद्र जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजुरा, श्री. ए. आर मडावी, पोलीस उपनिरीक्षक, विरूर स्टे., श्रीमती शुभांगी लाडसे, वाहतुक निरीक्षक राजुरा, श्री. बादल बेले अध्यक्ष (म.रा.) NEPHDO पर्यावरण संस्था राजुरा, श्री. संदिप शांतीलाल जैन, व्यापारी अध्यक्ष राजुरा, डॉ. आर. आर. खेरानी, उपप्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा, श्री. विजय दाळ, सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजुरा, श्री. एस. डी. येलकेवाड, वपअ राजुरा, श्री. वि. वा. नरखेडकर, वपअ स. व. अ. नि. राजुरा, व इतर प्रशासनिक अधिकारी व प्रतिनिधी, श्री. साईनाथ बदमकवार, सतीष धोटे, संतोष इंदुरवार, प्रभाकर ढवस, धनराज चिंचोलकर, कपिल इद्दे, चेतन जयपुरकर, प्रतिष्ठित नागरीक व पत्रकार आणि सर्व वनकर्मचारी उपस्थित होते. ( mahawani ) ( rajura ) ( jogapur )

To Top