महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२२-२३ सुरू करावी.

Mahawani


आ. सुभाष धोटेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०२ डिसेंबर २३

            राजुरा : राजुरा मतदार संघातील बालाजी अमोल ताजने व इतर पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण घेणारे उमेदवार तह. राजुरा जि. चंद्रपूर यांचे प्राप्त निवेदनानुसार, निवेदनातील सर्व उमेदवार पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. सद्या गृह विभागात भरपुर रिक्त पदे असुन सदर उमेदवार पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. ३ मार्च २०२३ च्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत २ वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवुन देण्यात आली आहे. माझे मतदार संघातील मुले-मुली गेली वर्षभरापासुन पोलीस भरती पुर्ण प्रशिक्षण घेत असुन दिनांक ३१ डिसेंबर २०२३ च्या पुर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घेतल्यास लाखो उमेदवार पोलीस भरतीला पात्र ठरतील. 

            तरी पोलीस भरती पुर्ण प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांच्या प्रयत्नांना यश मिळणेसंदर्भाने महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सुरू करण्यात यावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Maharashtra Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top