शिव दूतांनी सरकारच्या योजना घराघरात पोहचवाव्यात
-शिवसेना सचिव, प्रवक्ता आ. डॉ . मनिषाताई कायंदे
१२ डिसेंबर २३
चंद्रपुर : शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ प्रमुख किरणभाऊ पांडव यांच्या सूचनेनुसार संपर्कप्रमुख श्री गंगाधरजी बडूरे यांचे उपस्थितीत शिवसेना सचिव, प्रवक्ता आ. डॉ . मनिषाताई कायंदे व कलाताई शिंदे उपनेत्या शिवसेना यांनी आज चंद्रपूर शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना यथोचित्त मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे साहेब ( Chief Minister Hon. Eknath Shinde ) यांनी जो कामाचा धडाका लावला, ज्या योजना जनसामान्यांसाठी लागू केल्या त्या योजना शिवदूतांनी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून सरकारच्या कार्याची माहिती घराघरात पोहोचवावी व शिवसेना वाढीसाठी कार्य करावे. तसेच माननीय मुख्यमंत्री यांचे हात बळकट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी शासनाच्या योजना मिळवुन देण्यासाठी जनतेची साथ देवून कार्य करावे यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या अडचणी काय आहेत, त्या मांडल्या तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे यांनी शिवसेना सरकार मध्ये असतानाही शिवसैनिकांना न्याय मिळत नाही अशी खंत व्यक्त केली यावेळी नवनियुक्त महिला जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर व मीनलताई आत्राम यांचा सत्कार माननीय मनीषा ताई कायंदे यांच्या हस्ते करण्यात आला . प्रतिमा ताई ठाकूर यांच्या नेतृत्वात शेकड़ो महिलांणी पक्षप्रवेश केला. तसेच वरोरा विधानसभेच्या महिला उपजिल्हाप्रमुख कल्पनाताई भुसारी यांच्या नेतृत्वात भद्रावती तालुक्यातील ढोरवासा गावातील अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला . त्याचप्रमाणे बंडूभाऊ हजारे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात सुद्धा महिलांनी पक्ष प्रवेश केला. चंद्रपुर महानगर प्रमुख भरतजी गुप्ता व शिवसेना चंद्रपुर तालुकाप्रमुख संतोषभाऊ पारखी यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांच्या नवीन नियुक्तीपत्र व श्री कमलेश शुक्ला उपजिल्हाप्रमुख बल्लारपूर विधानसभा क्षेत्र व मूल तालुकाप्रमुख आकाश कावळे यांच्या नेतृत्वात सुद्धा तालुक्यातील पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे संचालन श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी केले व प्रास्ताविक सौ .योगिताताई लांडगे जिल्हा संघटिका महिला आघाडी चंद्रपूर यांनी केले .या कार्यक्रमानंतर वरोरा येथे पत्रकार बांधवांशी चर्चा करताना आमदार डॉक्टर मनीषा ताई कायंदे व कला ताई शिंदे उपनेते शिवसेना यांनी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विविध निर्णय यांची माहिती व लेक लाडकी योजना एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलत आनंदाचा शिधा आता वर्षभर मिळेल अशा विविध योजनांची माहिती देऊन विनंती केली की आपल्या माध्यमातून या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण मदत करावी या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते, सौ मनिषाताई पापडकर महिला आघाडी जिल्हा प्रमुख नागपूर, आशिष ठेंगणे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख, श्रीकांत खंगार तालुका प्रमख वरोरा, राजेश डांगे शहर प्रमुख वरोरा, सुंदरसिंग बावरे उपतालुका प्रमुख भद्रावती हे उपस्थित होते . चंद्रपूर मेळाव्यासाठी शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख सर्व शहर प्रमुख महिला आघाडी तालुकाप्रमुख महिला आघाडी शहर प्रमुख व शेकडो महिला शिवसैनिक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. ( mahawani ) ( shivsena ) ( chandrapur )