शिवसेना चंद्रपुर संपर्कप्रमुख मा. गंगाधरजी बडुरे यांच्या उपस्थितीत चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला यांच्या पुढाकाऱ्याने बल्लारपुर शहरातील शेकड़ो महिला व युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश!
१९ डिसेंबर २३
चंद्रपुर : शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे साहेब यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मा. किरणभाऊ पांडव यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख मा. गंगाधरजी बडुरे साहेब व शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख श्री. नितीनभाऊ मत्ते यांचे सूचनेनुसार चंद्रपुर उप-जिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला यांच्या उपस्थितीत शासकीय गेस्ट हाऊस, बल्लारपुर येथे दि. 17 डिसेंबर 2023 रोज रविवारला दू. 1 वा. बल्लारपुर विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना पक्ष वाढ़ीसंदर्भातील आढावा बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीला शिवसेना बल्लारपुर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर, बल्लारपुर तालुका प्रमुख जमील शैख़ सब्बर, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार, मुल तालुका प्रमुख आकाश कावळे, शहर प्रमुख विशाल नागुलवार, तालुका संघटक सुधीर ठाकुर, उपतालुका संतोष श्रीरामे, उपतालुका प्रमुख संतोष ईप्पलवार, उपतालुका प्रमुख हर्षल साळवे, उपतालुका प्रमुख अविनाश ऊके यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना चंद्रपुर संपर्क प्रमुख मा. गंगाधरजी बडुरे यांच्या उपस्थितीत तसेच चंद्रपुर जिल्हा प्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला यांच्या पुढाकाऱ्याने बल्लारपुर शहरातील शेकड़ो महिला व युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला
शिवसेना चंद्रपुर संपर्क प्रमुख मा. गंगाधरजी बडुरे यांनी बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शाखा प्रमुख, बूथ प्रमुख व शिवदूत यांची तात्काळ नेमणूक करण्याच्या सुचना देवून तालुका प्रमुख व शहर प्रमुखांना शासकीय समितीवर नियुक्ति करण्यासंदर्भात पालकमंत्री तसेच पक्षश्रेष्ठी यांना न्याय देण्याची मागणी करेल, अशी ग्वाहीं आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना देवून येणाऱ्या जि. प., पं. स. व महानगर पालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील. तसेच मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र सरकारद्वारे घेतलेल्या निर्णयाची माहिती घराघरात पोहचवा असे आढावा बैठकीमध्ये सुचना दिल्या. ( mahawani ) ( chandrapur ) ( santosh parkhi )