Tiger's terror in Babapur-Manoli | गोवरी-बाबापुर क्षेत्रात "वाघाची" दहशत.

Mahawani

वाघाच्या दहशतीने बाबापुर-मानोली (बु.) गावात भयाचे वातावरण

  • महावाणी : विर पुणेकर
  • १२ डिसेंबर २३

राजुरा : तालुक्यातील बाबापुर-मानोली (बु.) गाव शिवारात वाघाच्या वावरामुळे संपूर्ण गाववासी आणि वाहतूक कर्ते अत्यंत भयभीत झाले आहेत. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) ने या क्षेत्राला व्यापून टाकले आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल उगले आहे आणि त्या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर आहे. वाघाच्या शिरकावामुळे या क्षेत्रात अत्यंत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.


आज, वाघाने वाहतूक करते, काम करणारे कामगार, आणि गुरे चरायला नेणाऱ्या गुरख्यांशी सामना केला. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बाबापुरच्या मार्गावरून चंद्रपूरकडे जाणारे वाहने वाघाच्या दहशतीमुळे वेगळ्या मार्गाने जात आहेत. दिवसा-रात्री गावातून ये-जा करणे गावकऱ्यांनी सदर मार्ग टाळले आहे.


संबंधित वन विभागाला या बाबीची माहिती देण्यात आली आहे, पण त्यांच्याकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. आज रुपेश मिलमिले (बाबापुर) यांच्या गाईला वाघाने गंभीर दुखापत केली आहे. ८ डिसेंबर रोजी गुलाब रासेकर (मानोली (बु.) यांच्या गाईवर वाघाने हल्ला केला होता. यामुळे गावकऱ्यांनी आपल्या गुरांना बाहेर चरायला नेण्याचे टाळले आहे.


गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत वाघाला पकडून कैद केले जात नाही, तोपर्यंत ते आणि त्यांच्या गुरांना बाहेर चरायला नेणार नाही. त्यांनी वन विभागाला चेतावणी दिली आहे की, त्वरित वाघाला पकडून त्याची योग्य ती कारवाई केली नाही तर गाववासीच वाघाला धडा शिकवणार असल्याचे सांगितले आहे.


बाबापुर-मानोली (बु.) गावात वाघाच्या वावरामुळे संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या जंगलात वाघाने शिरकाव केला आहे, ज्यामुळे वाहतूक कर्ते आणि गावकरी संकटात आहेत. वाघाच्या दहशतीमुळे वाहतूक कर्ते मार्ग बदलत आहेत आणि गावकऱ्यांनी दिवसा-रात्र बाहेर जाणे टाळले आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. आज वाघाने दोन गाईंवर हल्ला केला आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी आपल्या गुरांना बाहेर चरायला नेनेहि टाळले आहे. 


वाघाच्या वावरामुळे गावात निर्माण झालेली दहशत गंभीर आहे. वन विभागाने त्वरित कारवाई केली पाहिजे. अन्यथा, गावकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया गंभीर समस्येला जन्म देऊ शकते.


#TigerTerror #BabapurManoli #ForestDeptAction #WildlifeCrisis #IndiaNews #BreakingNews #LocalStories #WildlifeConflict #Chandrapur

बघा व्हिडीओ




#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top