तहसीलदार जिवती यांना अतिक्रमण काढण्याकरिता निवेदन.
महावाणी - विरेंद्र पुणेकर
२८ जानेवारी २४
जिवती : नुकतेच प्रभू श्री. राम मंदिर अयोध्या येथे प्रभू श्री. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठान झाल्याने सर्व भारतवर्ष जय श्री रामाच्या जयघोषाने दुमदुमला होता परंतु येल्लापूर येथील पुरातन काळापासून राखीव असलेल्या हनुमान मंदिराच्या जागेवर ग्रा. पं. येल्लापूर संगणक चालकाणे अतिक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. करिता समस्त गावकरी, हनुमान भक्त येल्लापूर यांनी मा. तहसीलदार, जिवती यांना निवेदनातून सदर अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. ग्रा. पं. येल्लापूर येथील सार्वजनिक हनुमान मंदिरा साठी राखीव असलेल्या जागेवर गावातील दीपक साबणे (ग्रा. पं. येल्लापूर संगणक चालक) नामक व्यक्तीने अतिक्रमण करत घराचे बांधकाम सुरु केले आहे. परंतु सदर रिक्त जागा व्यक्तीक नसून हनुमान मंदिराकरिता ५०x५० चौ. फु इतकी जागा मा. तहसीलदार, तलाठी यांनी गावात सर्वेक्षण करून राखीव दिली आहे. त्या जागेवर गावकर्यांनी सन- १९८० साली ०५X०५ चौ. फुटाचा (पार) चोबुत्रा बांधला असून बाकी ४५X४५ चौ. फुट रिक्त ठेवण्यात आली होते.
सदर हनुमान मंदिर (पार) हा 1980 पासून अस्तित्वात आहे सदर हनुमान पाराला पोळ्याच्या दिवशी बैल फिरवतात गावात हनुमान देवाचे बरेच श्रद्धाळू भाविक आहेत आणि वरील गैर अर्जदार हा ग्रा.पं. चा ऑपरेटर आहे त्याने स्वहाताने ग्राम पंचायायाताच्या दस्तावेजात फेर बदल करून जागेवर कब्जा केलेला आहे.
हनुमान पराची जागा हि 1994 मध्ये कोरपना तालुक्यातील तत्कालीन नायब तहसीलदार जोशी साहेब आणि तत्कालीन तलाठी मोहितकर साहेब यांनी सर्व गावकर्यांना समक्ष हनुमान पराची जागा मोजमाप करून गावकर्यांना हस्तांतरित केली होती परंतु ग्रा.पंचायतीचे ऑपरेटर साहेब दीपक भारत साबणे यांनी सदर जागा हस्तगत केली आहे आणि हनुमान पारावर ये-जा करणेस पूजा आरतीला व पोळ्याच्या सणाला, सदर पारा भोवतीची सर्व रिक्त जागा कब्जावल्याने बैल फिरवण्यास गावकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सदर राखीव जागा कब्जावल्याने गावकर्यांनी हमुनान मंदिर बांधायला जागा उपलब्ध राहिलेली नाही.
पाराच्या दक्षिणेस महारष्ट्र तेलंगाना रोड आहे. पूर्वेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि उत्तरेकडील जागा दीपक साबणे यांनी काब्जावलेली आहे. यामुळे हनुमान भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. कारण येत्या हनुमान जयंतीस हनुमान मंदिराच्या जागेवर मंदिराची पायाभरणी आहे. तेव्हा यावर योग्य विचार करून सदर जागा गावकर्यांना पुन हस्तांतरित करावी अन्यथा गावात कधीही उद्रेक होणे नाकारता येत नाही. अशी मंग येल्लापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
" सदर जागेवर अतिक्रमण केले नसल्याचे लवकरच कागदोपत्री सिद्ध करेल - दीपक भारत साबणे "
" पुरातन काळापासून सदर जागा हनुमान मंदिरा करिता राखीव असून आज ग्रा. पं. संगणक चालकाने आपले अधिकार वापरून कागदोपत्री फेर बदल करत सदर जागेवर अतिक्रमण केले आहे.
- मचींद्र मानकर, भारत कांबळे, सौ. पद्मिनी कांबळे, सुधाकर कांबळे, सौ. नागमिनीबी चिकटे, वैजनाथ वाघवसे, शौ. गजरबाई वाघमारे, येल्लापूर " (Encroachment on the site of Hanuman temple!) (mahawani) (jivti) (yellapur)