सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार संशयित वाहनाचा पाठलाग करत घेतली झडती
३१ जानेवारी २४
राजुरा : आज दुपार 03.00 वाजता एका संशयित ट्रक मधून आज रात्रौ अवैध गोवंश वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राजुरा पोलिसांना मिळाली असता लगेच राजुरा पोलिसाच्या एका चमूने सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग करत गौरव पेट्रोलपंप कापनगाव जवळ MH-40-Y-0696 क्रमांकाच्या वाहनाला अडवून झडती घेतली असता वाहनात 57 गोवंश क्रूरपणे कोम्बुन असल्याचे दिसून आले हे पाहताच आरोपी वाहन (ट्रक) सोडून पसार झाले.
सदर वाहनात कोम्बल्या स्थितीत मिळालेल्या 57 गोवंश (जनावरे) 6 लाख व दहा चाकी वाहन (ट्रक) 10 लाख रुपये असे एकूण 16,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर संबंधित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक रवींद्र परदेशी (Superintendent of Police Ravindra Pardeshi), अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु (Upper Superintendent of Police Rina Janbandhu), उपविभागिय पोलीस अधिकारी दिपक साखरे, राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात ओमप्रकाश गेडाम पोलीस उपनिरीक्षक, संपत्ती बंडी, आकाश पिपरे, दिनेश देव्हाडे यांनी केली. (Rescue of 57 cattle being taken to slaughter) (rajura police) (mahawani) (gowansha)
- ओमप्रकाश गेडाम -पोलीस उपनिरीक्षक यांची माहिती व छायाचित्रे