उद्या स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे उदघाट्न.

Mahawani


संध्या स्मृती विहार, पद्मापूर जि. चंद्रपूर येथे तीन दिवशीय मेळाव्याचे आयोजन.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
28  जानेवारी 24

राजुरा : भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा कार्यालयाच्या वतीने दि.२९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत संध्या स्मृती विहार पद्ममापूर ता. जी. चंद्रपूर येथे स्काऊट्स गाईड्स जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 जानेवारी ला दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून सुधीर मुनगंटीवार, मंत्री -वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय (म. रा.) तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा यांची उपस्थिती राहील तर कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेक जॉन्सन (भाप्रसे ) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर प्रमुख उपस्थिती राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त, स्काऊट, चंद्रपूर, कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य .) तथा जिल्हा मुख्य आयुक्त, गाईड , चंद्रपूर, रामपाल सिंग, अध्यक्ष, नियमाक मंडळ, शासकीय अभियांत्रिकी महा. चंद्रपूर, सूर्यकांत खणके, माजी मुख्यालय आयुक्त, स्काऊट, चंद्रपूर, वनिता आसुटकर, माजी सदस्य, जि.प. चंद्रपूर, आम्रपाली अलोणे, सरपंच, ग्रामपंचायत, पद्मापूर आदींची उपस्थिती राहील. सायंकाळी 7 वाजतां सांस्कृतीक महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात येणाऱ्या मान्यवर अतिथिंचे, चंद्रपूर जिल्ह्यातुन मेळाव्यात सहभागी स्काऊट -गाईड यांचे स्वागत जिल्हा संघटक (स्काऊट ) चंद्रकांत भगत , मेळावा प्रमुख  किशोर उईके , कार्यक्रम प्रमुख  शांताराम उईके,  मेळावा उप प्रमुख (स्काऊट)  यशवंत हजारे, मेळावा उप प्रमुख (गाईड ) रंजना किन्नाके , मेळावा  क्वार्टर मास्टर  प्रशांत खुसपुरे,  मेळावा प्रसिद्धी  प्रमुख  बादल बेले यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ३८ शाळांचे ९१४ च्या वर विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार असून या मेळाव्यात प्रथमोपचार, संचलन (मार्चपास), ग्याझेट व तंबू निरीक्षण, शारीरिक कवायती, मानवी मनोरे, कार्यक्रम, विविध सामाजिक संदेश, जनजगृतीपर शोभायात्रा, साहसी खेळ इत्यादी स्पर्धा होणारआहेत. (mahawani) (rajura) (Scout-guide) (Inauguration of Scout-Guide District Meet tomorrow.)

To Top