२७ जानेवारी २४
चंद्रपुर : गुरूवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंती निमित्त चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या VIP गेस्ट हॉउस, चांदा क्लब जवळ, चंद्रपुर येथे आज दी.27 जानेवारी 2024 रोज शनिवारला दु. 3 वा. गुरूवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण, व अभिवादन करुन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेना पक्षाचे नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंदजी चिंतामण दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. ठाण्यातल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक सभेला दिघे साहेबांची हजेरी असायची. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला आणि त्यांनी शिवसेनेसाठी निरंतर काम करुन शिवसेनेसाठी स्वतःच आयुष्य अर्पण केलं होतं, यासाठी त्यांनी कुटुंबियांनाही लांब करुन त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणाची कामे केली. त्यांची धर्मावर खुप श्रद्धा होती. त्यांनीच सर्वप्रथम टेंभी नाक्यावर जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवात पहिली दहीहंडीही सुरू केली होती. त्यांच्या या धर्म निष्ठेमुळे ते 'धर्मवीर' म्हणूनही लोकांमध्ये लोकप्रिय होते.
सदर जयंती प्रसंगी चंद्रपुर शिवसेना उप जिल्हाप्रमुख कमलेशभाई शुक्ला, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, वैद्यकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वड्डेटीवार, चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे, चंद्रपुर उप तालुका प्रमुख अविनाश ऊके, चंद्रपुर उप तालुका प्रमुख गुरुदास मेश्राम, जिशान शेख व समिर जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (Guruvarya Dharmaveer Anandji Dighe's birth anniversary was celebrated with great enthusiasm in Chandrapur) (mahawani) (chandrapur)